ताज्या घडामोडी

संतकृपा हाॕस्पिटल व पंचकर्म सेंटर चे स्वामी अरविंदनाथजी महाराज याचे हस्ते उद्घाटन ..

संतकृपा हाॕस्पिटल व पंचकर्म सेंटर चे स्वामी अरविंदनाथजी महाराज याचे हस्ते उद्घाटन ..
लोणावळा (प्रतिनिधी ) संतकृपा हाॕस्पिटल व पंचकर्म सेंटर चे स्वामी अरविंदनाथजी महाराज याचे हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रवचन , हरिपाठ , आरोग्य शिबीर आणि ह.भ.प.कृष्णा महाराज पडवळ यांचे सुश्राव्य कीर्तनाचा व भजनाचा कार्यक्रम झाला.
कुसगाववाडी येथे संतकृपा हाॕस्पिटल व पचकर्म सेंटर च्या उद्घाटनासाठी , सुंदरमठ ,शिवथरघळ येथील विश्वस्थ , समर्थ आत्मचरिञाचे संशोधक तसेच सरनौबत कोँडाजी रायाजी शेलार मामा यांची कुळपरंपरा असलेले व आळंदी येथील श्री गणेशनाथ महाराज संस्थानचे स्वामी अरविंदनाथजी महाराज यांचे हस्ते उद्घाटन फीत कापून झाले. यावेळी स्वामींनी सुश्राव्य असे प्रवचन केले.तसेच या शुभ कार्यासाठी धार्मिक कार्यक्रम व आरोग्य शिबीराचे समाजोपयोगी कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख प्रवचनात केला. ह.भ.प.धर्मा महाराज भोईर यांचेकडून हरिपाठ करण्यात आला.
राञी आठ ते दहा ह.भ.प.कृष्णा महाराज पडवळ (,मुळशी ) यांनी यावेळी कुळी कन्या पुञ होतील सात्त्विक ! या संत तुकाराम महाराज यांचे अभंगावर कीर्तन केले. यावेळी भजनगायक व मृदूंगमणी , यांनी साथसंगत केली. राञी संत गोरोबाकाका सांस्कृतिक भजनी मंडळाचा (तुपगाव, खालापूर ) आणि श्री ञिमुर्ती भजनी मंडळ , कोळवली , मुळशी यांचा भजनाचा कार्यक्रम झाला. ह.भ.प.पडवळ महाराज म्हणाले , माजी केंद्रप्रमुख श्री मारूती संभाजी कुंभार यांनी सुमारे पंचवीस वर्षे भांबर्डे गावात शाळेत मुख्याध्यापक म्हणून विद्यार्जन केले. त्यांचेकडून पंढरीच्या वारीसाठी नित्यनेमही चुकला नाही. कधीही रजा व सुट्या न काढता अखंड सेवा करत असताना ते वाखरीवर येवून पालखीबरोबर दिंडीमधील वारकऱ्यांचे बरोबर विठ्ठलाचे दर्शनास जात असतात. त्यांचे सुपुञ डाॕ.राजेश कुंभार , मुली कुणी परिचारिका , कुणी पदाधिकारी, सून सौ.पूजा राजेश कुंभार , जावई , मुलगी डाॕक्टर आहेत. ,तर सौ.भारतीताई मारूती कुंभार या आंगणवाडी पर्यवेक्षिका आहे. असे समाजकार्यात अखंड कार्यरत कुंभार कुटूंब समाजासाठी झटत आहे,असे गौरवोद्गार काढले.
सकाळी १० ते ४ पर्यत आरोग्य तपासणी शिबीर झाले. यावेळी डाॕ.आनिरूध्द पवार , डाॕ.विक्रम कोळेकर , दँतरोग तज्ञ डाॕ.रविना कोळेकर, डाॕ.रचिता कांबळे यांनी रूग्ण तपासले.
या कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव, कुसगाव बुद्रूक च्या सरपंच अश्नीनीताई ज्ञानेश्वर गुंड,उपसरपंच सूरजभाऊ केदारी , सदस्य विशाल तिडके,डोंगरगाव चे सरपंच सुनिल येवले , व सर्व सदय्य , भांबर्डेचे सरपंच श्रीराम वायकर , कुंभार समाज पुणेजिल्हा अध्यक्ष संतोष कुंभार , लोणावळा अध्यक्ष अमोल दरेकर , शिवसेना उपतालुकाप्रमुख आशिश ठोंबरे , सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब बुटाला , गट विकास अधिकारी सुधीर भागवत , जेष्ट आयुर्वेदतज्ञ डाॕ.रामदास आव्हाड, कुसगाव चे केँद्रप्रमुख मुकूंद तनपुरे , स्वाध्याय परिवार चे बाळासाहेब कुंभार , मा.जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब राक्षे ,सी.डी.पी विशाल कोतागडे , तालुका आरोग्य आधिकरी डाॕ.चंद्रकांत लोहारे, कार्लाच्या आरोग्य आधिकारी डाॕ.भारती पोळ , स्ञी रोगतज्ञ डाॕ.सिमा शिंदे , डाॕ.अमोल कालेकर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्ला २ च्या अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच भाविक , वारकरी , मृदूंगाचार्य , यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन माजी केँद्रप्रमुख मारूती कुंभार , आंगणवाडी पर्यवेक्षिका भारती मारूती कुंभार , संतकृपा हाॕस्पिटलचे संचालक डाॕ.राजेश मारूती कुभार व डाॕ.पूजा राजेश कुंभार तसेच .संहीता राजेश कुंभार यांनी केले..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!