ताज्या घडामोडी

कुत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याबद्दल तळेगाव दाभाडे नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना  तळेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी” तर्फे निवेदन देण्यात आले.

मुख्याधिकारी यांच्या दालनाला कुलूप लावून निषेध केला जाईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

कुत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्याबद्दल तळेगाव दाभाडे नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना 
तळेगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी” तर्फे निवेदन दिले.
आज दिनांक 19/5/22, गुरुवार रोजी तळेगाव दाभाडे नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना गाव व स्टेशनं विभागात कुत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली या बद्दल निवेदन दिले गेले

नगरपरिषद तर्फे गाव / स्टेशनं भागात कमी दाबाचे व अनियमित पाणीपुरवठा करून, जाणीवपूर्वक कुत्रिम पाण्याचा तुटवाडा कर्मचारी यांच्या कडून केला जात आहे. नागरिकांना  ऐन  उन्हाळ्यात पाण्याच्या समस्याला तोंड देउन पाण्याचे टँकर खरेदी करावे लागतं आहे.

सदरील प्रकार हा आधीचे मुख्याधिकारी सतीश दिघे  यांच्या बदली नंतर घडू लागले. आताचे मुख्याधिकारी यांची अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर पकड नसल्यामुळे हा प्रकार घडत आहे.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निवेदनद्वारे 7 दिवसाचा आवधी दिला आहे. जर हा प्रकार थांबला नाही तर येत्या_गुरुवारी_दिनांक 26/5/22 रोजी तिर्व आंदोलन करून, मुख्याधिकारी यांच्या दालनाला कुलूप लावून निषेध केला जाईल असे निवेदन दिले.

सदरचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराचे अध्यक्ष  तळेगाव अध्यक्ष गणेश काकडे आणि तळेगावशहरअध्यक्षा शैलेजाताई काळोखे यांच्या नेतृत्वखाली निवेदन उपमुख्याधिकारी यांना देण्यात आले.

ह्या प्रसंगी शहर कार्याध्यक्ष विशाल पवार, वरिष्ठ उपाध्यक्ष आशिष खांडगे,जेष्ठ नेते दिलीप काका खळदे, मा. नगरसेवक अरुण पवार,महिला कार्याध्यक्ष अर्चना दाभाडे,स्टेशनं विभाग अध्यक्ष करण शेळके, विद्यार्थी अध्यक्ष ओमकार जाधव,गाव विभाग अध्यक्ष हर्षद पवार, कार्याध्यक्ष धनराज माने, विद्यार्थी अध्यक्ष पुष्पक दाभाडे , कार्याध्यक्ष आकाश टकले सोशल मीडिया अध्यक्ष गणेश निळकंठ व सर्व सेलचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!