ताज्या घडामोडी

नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ टेककल्ट ‘ – २०२२ राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा उत्साहात संपन्न.

कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी लागणारे कला कौशल्य महाविद्यालयात आत्मसात करण्याची व कंपनी आणि महाविद्यालय यांच्यातील संबंध वाढवण्याची गरज आहे.

  तळेगाव दाभाडे: नूतन अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ टेककल्ट ‘ – २०२२ राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा उत्साहात संपन्न.

अंतिम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांना चालना देण्यासाठी व कौशल्य गुण विकसित करण्यासाठी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळांच्या नूतन अभियांत्रिकीच्या संगणक विभागामार्फत ‘ टेककल्ट ‘ – २०२२ राष्ट्रीय प्रकल्प स्पर्धा पार पडली .
‘ टेककल्ट ‘ – २०२२ स्पर्धेत विविध महाविद्यालयातील ६२ संघाच्या सुमारे २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला . या स्पर्धेसाठी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक व आयटी कंपनींमधील व्यवस्थापक यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
‘ टेककल्ट ‘ कार्यक्रम आयोजित करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.राज्यमंत्री संजय ( बाळा )भेगडे , उपाध्यक्ष गणेश खांडगे,सचिव संतोष खांडगे, सहसचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के , प्राचार्य डॉ . ललितकुमार वधवा,एनसीईआर च्या प्राचार्या डॉ अपर्णा पांडे , विभाग प्रमुख डॉ . विनोद किंबहुने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
‘कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी लागणारे कला कौशल्य महाविद्यालयात आत्मसात करण्याची व कंपनी आणि महाविद्यालय यांच्यातील संबंध वाढवण्याची गरज आहे,’ असे मत प्रा.शीतलकुमार रवंदळे यांनी व्यक्त केले.
पीसीईटी नूतन चे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेंटर चे अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळे , पीसीसीओईआर चे प्राचार्य डॉ . हरिशकुमार तिवारी , सीओईपीचे प्रा . अभिषेक भट्ट , प्रा . दीपक क्षिरसागर आदी या कार्यक्रमास उपस्थित होते .
ह्या कार्यक्रमासाठी , हिटबुलसआय , मास टेकनॉलॉजि , टॉप आयटी अकॅडमी , रोटरी क्लब तळेगाव , नेक्स्ट जेन अकॅडमी , एकदंत डेंटल अकॅडमी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे संयोजन प्रा.किशोर पाठक ,प्रा. प्रकाश क्षीरसागर व प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी संयोजक आकांशा क्षत्रिय व साक्षी महाडिक यांनी केले.
या कार्यक्रमास सूत्रसंचालन इशिता बन्सल व पार्थ जयस्वाल यांनी केले. व आभार प्रदर्शन आकांशा क्षत्रिय हिने केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!