आय एन एस शिवाजीमधे मिलीटरी इंजिनियरींग खात्यातील अधिका-यांचे वाहनावरील चालक कृष्णा कोँडू मातेरे (वय-९२) यांचे वृध्दापकाळाने निधन.
! निधनवार्ता ! लोणावळा : कुरवंडी मधील सेवानिवृत्त अधिकारी कृष्णा मातेरे यांचे दु:खद निधन.
लोणावळा (प्रतिनिधी ) कुरवंडे मधील सेवानिवृत्त अधिकारी ,आय एन एस शिवाजीमधे मिलीटरी इंजिनियरींग खात्यातील अधिका-यांचे वाहनावरील चालक कृष्णा कोँडू मातेरे (वय-९२) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांचे पश्चात सध्या त्यांना सात विवाहीत मुली , नातवंडे , पतवंडे असा परिवार आहे. युवक कार्यकर्ते मदन हनुमंत मातेरे व संतोष हनुमंत मातेरे हे त्यांचे नातू होत. त्यांच्या पत्नी कै.अंजनाबाई कृष्णा मातेरे या आंबेकर (पाटील ) प्रतिष्ठित घरातील होत्या. त्यांचे सुपुञ कै.हनुमंत कृष्णा मातेरे यांचे अकस्मिक निधनानंतर सून श्रीमती द्रोपदाबाई मातेरे आणि नातवंडे यांनी त्यांची कोविड काळातही चांगली काळजी घेऊन व्यवस्था ठेवली होती.