ताज्या घडामोडी

महाराष्ट्र शिक्षक पँनेल यांचा राज्यस्तरीत आदर्श शिक्षक पुरस्कार मावळातील अक्षदा आगळे यांना सिनेअभिनेत्री निशिगंधा वाड यांच्या हस्ते प्रदान.

भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे झालेल्या महाराष्ट्र शिक्षक पॅनल यांच्या राज्यस्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात मावळ तालुक्यातील जांभवली येथील उपक्रमशील शिक्षिका अक्षदा संपत आगळे यांना सन्मानित करण्यात आला.

महाराष्ट्र शिक्षक पँनेल यांचा राज्यस्तरीत आदर्श शिक्षक पुरस्कार मावळातील अक्षदा आगळे यांना प्रदान.                  पिंपरी चिंचवड: भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे झालेल्या महाराष्ट्र शिक्षक पॅनल यांच्या राज्यस्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात मावळ तालुक्यातील जांभवली येथील उपक्रमशील शिक्षिका अक्षदा संपत आगळे यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी सिनेअभिनेत्री डॉ.निशीगंधा वाड,शिक्षक आमदार विक्रम काळे,सुधीर तांबे व दिपक चामे व इतर मान्यवर उपस्थित होते.शिक्षक पॅनल निवड समितीतील सदस्या ज्योती बुरांडे,जगताप सर,श्री वैभव पाठक आदींनी त्यांची निवड केली.
अक्षदा आगळे या जांभवली सारख्या दुर्गम भागातील शाळेत कार्यरत असून शाळेच्या विकासासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविलेले आहेत.शाळेचा भौतिक विकास साधत असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी अनेक सहशालेय उपक्रमही राबवले आहेत.यापूर्वी त्यांनी गोवित्री,कांब्रे ना.मा येथे काम केले असून त्यांच्या कार्याचे अधिकारी वर्गानेही वेळोवेळी कौतूक केले आहे.यापूर्वी त्यांना पंचायत समिती मावळचा गुणवंत शिक्षिका पुरस्कार मिळालेला असून महाराष्ट्र शिक्षक पँनेलचा राज्यस्तरावरील पुरस्कार प्राप्त झाल्याने शिक्षक वर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!