ताज्या घडामोडी

यात्रेकरूंची तुफान गर्दी! अखेर चारधाम यात्रेचे बुकींग या तारखेपर्यंत बंद.  

आतापर्यंत सुमारे 80 बनावट नोंदणीची आली असून अशा लोकांना पुढे जाण्यापासून रोखण्याबरोबरच चौकशीही करण्यात येत आहे. कोणत्याही प्रवाशाला नोंदणीशिवाय प्रवास करू दिला जाणार नाही.

यात्रेकरूंची तुफान गर्दी! अखेर चारधाम यात्रेचे बुकींग या तारखेपर्यंत बंद  

Table of Contents
सार्वजनिक व्यवस्थेचे तीन तेरा कोरोनामुळे गेली दोन वर्षे न झालेली चारधाम यात्रा यंदा करण्यासाठी यात्रेकरुंची तुफान गर्दी आहे. परिणामी, उत्तराखंडमध्ये उडाले आहेत. शुक्रवारी तब्बल ३ हजार यात्रेकरु डेहराडूनमध्ये अडकून पडले. आता तर यात्रेकरूंची एवढी गर्दी झाली आहे की यात्रेचे बुकींगच फुल्ल झाले आहे. त्यामुळे नव्या नोंदणीसाठी उत्तराखंड सरकारनेकेदानाथ-बद्रीनाथसह ,चारधाम दर्शनासाठी ३ जूनपर्यंतचे बुकिंग आतापर्यंत पूर्ण झाले आहे. ३ जूनपूर्वी कोणत्याही धाममध्ये नोंदणी करण्यास परवानगी दिली जाणार नाही. आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांकडून होणारी मर्यादित नोंदणीही पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. प्रवास करण्यास इच्छुक असलेल्यांना पर्यटन विभागाच्या पोर्टलवर पुढील बुकिंगसाठी स्लॉट तपासता येतील.

ग्रीन सिग्नल दिल्यानंतरच लोक त्या तारखेसाठी नोंदणी करू शकतात. बनावट नोंदणी करून चारधाम यात्रा करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. याप्रकरणी सरकारने कडक कारवाई करण्याच्या सूचना देशभरातील लोकांना पर्यटन विभागाच्या पोर्टल आणि अॅपच्या माध्यमातून चारधामसाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय इतर कोणत्याही वेबसाइटवरून नोंदणी करता येणार नाही. पर्यटन सचिव दिलीप जवळकर यांनी शनिवारी पर्यटन संचालनालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, चारधाम यात्रेदरम्यान काही यात्रेकरू बनावट नोंदणी करून येत असल्याच्या बातम्या येत आहेत. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे.

असे करणाऱ्यांबरोबरच सायबर सेलला सहकार्य करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. चारधाम यात्रेसाठी पर्यटन विभागाचे पोर्टल आणि मोबाईल अॅपवरूनच नोंदणी करता येणार असल्याचे जवळकर यांनी सांगितले. याशिवाय, जर कोणी इतर कोणत्याही वेबसाइटवरून नोंदणीचा दावा करत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे आहे.

ते म्हणाले की. आतापर्यंत सुमारे 80 बनावट नोंदणीची आली असून अशा लोकांना पुढे जाण्यापासून रोखण्याबरोबरच चौकशीही करण्यात येत आहे. कोणत्याही प्रवाशाला नोंदणीशिवाय प्रवास करू दिला जाणार नाही.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!