ताज्या घडामोडी

अखेर चंद्रकांत पाटलांनी केली दिलगिरी व्यक्त…..

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं.

अखेर चंद्रकांत पाटलांनी केली दिलगिरी व्यक्त…..

Table of Contents
मुंबई: ओबीसी आरक्षणाच्या विषयावरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंना ‘घरी जा, स्वयंपाक करा,’ असा मागास सल्ला देणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका झाली. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पाटील यांना सुनावलं. त्यानंतर राज्य महिला आयोगानं पाटील यांना नोटीस पाठवली आणि खुलासा मागितला. आता पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या नोटिशीला उत्तर देताना आपल्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं.

‘आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात गेल्यानंतर स्वयंसिद्धा, Helpers of the Handicap, सावली, आई, संवेदना व वात्सल्य सारख्या संस्थांच्या मागे उभे राहून महिला सबलीकरणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या पक्षाचा प्रदेश अध्यक्ष असणारा मी, ज्या पक्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत १२ महिला आमदार व देशाच्या लोकसभेत महाराष्ट्रातून ५ महिला खासदार आहेत. मला सुप्रियाताईंबद्दल व महिलांबद्दल मनात अनादर नसताना ग्रामीण म्हणीचा वापर केल्यामुळे अपमानित व्हावे लागते यासारखे आयुष्यात दुःख नाही,’ असं पाटील यांनी पत्रात म्हटलं आहे.

माझ्या ओबीसी बंधू-भगिनींना राजकीय आरक्षण न मिळाल्यामुळे मी त्रागाने केलेल्या उच्चारात सुप्रियाताई किंवा समस्त माता-भगिनींचा अपमान झाला असल्यास मी दिलगिरी व्यक्त करतो, असं पाटील यांनी पत्रात पुढे नमूद केलं आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!