लोणावळ्यातील तिन्ही पेट्रोल पंपावर साठा संपल्याने वाहनचालकांना मनस्ताप . क्रृत्रीम टंचाई मुळे वाहनचालक हैराण. लोणावळा ता.३० ( प्रतिनिधी ) लोणावळ्यातील तिन्ही पेट्रोल पंपावर साठा संपल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागला. पेट्रोल पँपावर पेट्रोल व डिझेल नसल्यामुळे अनेकांना कार्लाजवळ पेट्रोलपंपावर जावून रिक्षा ,कार ,मोटारसायकल साठी पेट्रोल आणावे लागले. लोणावळ्यात गवळीवाडा येथे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या . लोणावळा शहरचे पोलिस निरिक्षक सिताराम डुबल यांनी महामार्गावर भगवान महावीर चौकात पोलिस चौकीत बसून वहातूक पोलिसांना सूचना दिल्या व वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी मदत केली. मुंबई बाजूला व पुण्याकडे जा ये करणारी वाहने संथपणे जा ये करीत होती.
जड वाहने वलवण वरून द्रूतगतीमार्गावर वळविलेने अनेक महिन्यापासून वाहतूक कोंडी टाळली होती. ..शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी गर्दी होऊ लागले आहे. आज माञ सोमवती आमावस्या असल्याने आणि त्यातच पेट्रोल पंपावर साठा संपल्याने वाहतुक कोंडी झाली होती, ही क्रृत्रीम पेट्रोल व डिझेल टंचाई की दर कमी झाल्याने पंपावर वाहनांच्या लागलेल्या रांगा यामुळे वाहतूक कोंडी पहायला मिळाली. सलग सुट्यामुळे व आज पंप बंद असल्याने वाहनांची कोंडी झाली , असल्याची तक्रार रिक्षाचालकांनी आवाज न्यूजला केेेली.