ताज्या घडामोडी

कलापिनी आणि लायन्स क्लब कामशेत तर्फे आयोजित धम्माल शिबिर संपन्न !अंजली सहस्रबुद्धे.

समारोपाच्या कार्यक्रमात मुलांनी प्रार्थना, सूर्य नमस्कार,अभिनय गीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

तळेगाव दाभाडे : कलापिनी आणि लायन्स क्लब कामशेत तर्फे आयोजित धम्माल शिबिर संपन्न !

कलापिनी आणि लायन्स क्लब कामशेत तर्फे आयोजित धम्माल शिबिर संपन्न !

तळेगाव दाभाडे येथे कलापिनीचे शिबिर दरवर्षी होतेच घेतले जाते…परंतु या वर्षी एक वेगळा प्रयोग म्हणून कामशेत सारख्या ग्रामीण भागात धम्माल शिबिराचे आयोजन कलापिनी आणि लायन्स क्लब कामशेत यांनी केले होते..
कामशेतला अश्या प्रकारचे शिबिर प्रथमच झाले. अतिशय उत्तम असा प्रतिसाद तिथल्या पालकांकडून मिळाला. मुलांना काहीतरी वेगळे शिकायला,अनुभवायला मिळाल्यामुळे पालक वर्ग आणि मुले खुश होती.
कलापिनी संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ.  अंजली सहस्रबुद्धे यांनी संपूर्ण नियोजबध्द आखणी या शिबिराची केली होती.
शिबिरात मुलांना श्लोक, सूर्य नमस्कार,व्यायाम,अभिनय गीत,संभाषण,हस्तकला,चित्रकला, विविध पक्ष्यांची माहिती देण्यात आली.वाचनाची ओळख आणि गोडी लागावी म्हणून गोष्टीच्या पुस्तकं देण्यात आली.
कामशेत येथील डॉ.सहस्त्रबुध्दे यांच्या निवासस्थानी .विवेक सहस्त्रबुद्धे यांच्या सौजन्याने हे शिबीर रम्य,निसर्गाच्या सान्निध्यात मोकळ्या आणि प्रशस्त जागेमध्ये घेता आले.
८ दिवसाच्या या शिबिरसाठी ज्योती ढमाले,धनश्री वैद्य आणि अनघा बुरसे यांनी अंजली सहस्रबुद्धे विशेष सहकार्य केले.
कलापिनी संस्थेतील डॉ.अनंत परांजपे,अशोक बकरे,रामचंद्र रानडे,श्रीपाद बुरसे,श्री .गोखले, ज्योती गोखले यांनी येऊन मुलांना अभिनय गीत,हास्याचे प्रकार,पक्षांची माहिती आणि खूप खाऊ देऊन मुलांना खुश केले.
लायन्स क्लब कामशेटच्या लायन नंदा शेट्टी,लायन आशा अग्रवाल,लायन दिपाली ठोंबरे,लायन सीमा गुंजाळ,लायन सुवर्णा चोपडे आणि लायन प्रताप गुंजाळ,लायन राजू अग्रवाल,लायन अनुप सहस्त्रबुध्दे या लायन मेंबर्स नी या शिबिरासाठी खूप मदत केली. प्रत्येकाने आपला वेळ दिला आणि मुलांना,पालकांना भरपूर खाऊ पण दिला.
समारोपाच्या कार्यक्रमात मुलांनी प्रार्थना, सूर्य नमस्कार,अभिनय गीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. प्रियांका टाकवे,कोमल शिंदे आणि कावेरी वाळुंज या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. मुलांसाठी बाल भवन,कुमार भवन आणि सुट्टी मध्ये शिबिराचे आयोजन करा असे आग्रहाने सांगितले.
या कार्यक्रमाला अनघा बुरसे,केतकी लिमये आणि सर्व लायन मेंबर्स उपस्थित होते.
अंजली सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक केले, सूत्र संचालन धनश्री वैद्य यांनी केले तर स्वागत लायन नंदा शेट्टी यांनी व आभार प्रदर्शन लायन दिपाली ठोंबरे यांनी केले
लायन्स क्लब कामशेत तर्फे सगळ्यांना अल्पोपहार देण्यात आला. नटराज श्लोक म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!