ताज्या घडामोडी

वाळंज विद्यालयाचे, मुख्याध्यापक देवरे यांना शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार…..

संत साहित्यिक, "जगत गुरु तुकाराम महाराजांचे" वंशज डॉ सदानंद मोरे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

वाळंज विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देवरे यांना शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार…..

Table of Contents
मावळ वार्ता फाउंडेशन लोणावळा पुणे यांच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्ताने व मावळ तालुक्याचे आमदार  सुनील अण्णा शेळके यांच्या सहकार्याने उभारलेल्या भव्य दिव्य अश्या जगत गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जीवनावर आधारित महानाट्य प्रयोग प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना गौरवण्यात आले.
मावळ वार्ता फाउंडेशन चा मानाचा समजला जाणारा मावळ वार्ता शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार , सोनू अनाजी वाळंज माध्यमिक विद्यालय आंबवणे ता. मुळशी चे मुख्याध्यापक  भटू गिरीधर देवरे यांना प्रदान करण्यात आला.
संत साहित्यिक जगत गुरु तुकाराम महाराजांचे वंशज डॉ सदानंद मोरे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. या प्रसंगी माजी आमदार शरदराव ढमाले व संजयजी अडसूळ मुख्य संपादक, नंदकुमार वाळंज अध्यक्ष कोराईगड शिक्षण संस्था, डॉ.किरण गायकवाड कार्यक्रम प्रमुख,
वत्सलाताई वाळंज मा. आदर्श सरपंच,मिलिंद वाळंज उदयोजक व कॅनरी आयर्लँड,संजय जगताप तसेच सर्व आयोजन समिती यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.  देवरे यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर चे एकूण 12 पुरस्कार मिळाले आहेत. अती दुर्गम भागात केलेल्या गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक कार्या मुळे हा पुरस्कार देण्यात आला.
निवृत्त मुख्याध्यापक ,बापुलाल तारे व टेलिव्हीजन वृत्त वाचक, प्रदीप वाडेकर यांनी सूत्रसंचालन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!