ताज्या घडामोडी

उद्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा!

दोन पगड्या घालून होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मानित,देहू संस्थांकडून जोरदार तयारी.

आवाज न्यूज: उद्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा,दोन पगड्या घालून होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी सन्मानित,देहू संस्थांकडून जोरदार तयारी!!!

१४जून रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण सोहळा होणार आहे त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संस्थान तर्फे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पगडी घालून सन्मानित करण्यात येणार आहे.

पहिल्या पगडी वर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी लिहलेले अभंग लिहण्यात आले आहेत.

!!विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म,भेदाभेद भ्रम अमंगळ !!

या आशयाची पगडी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घालण्यात येणार आहे.आणि दुसऱ्या पगडीवर  काहीही लिहण्यात आलेले नसून दोन पगड्या घालून सन्मानित करण्यात येणार आहे.

देहू संस्थाना कडून पहिली पगडी कोणत्याही स्वरूपाचा अभंग न लिहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घालून सन्मानित करण्यात येणार आहे. त्यामुळे विरोधकांना चांगलीच चपराक बसणार असल्याची चर्चा जोरदार पणे देहू मध्ये सुरु आहे. याअगोदर पासून पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे फ्लेक्स सर्वत्र झळकत आहे.

 

त्यामध्ये सगळीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो मोठे फ्लेक्स झळकले असल्याने विरोधकांकडून मोठे वादळ उठवले असल्याचे दिसून येत आहे.त्यामध्ये देहू संस्थां कडून लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंदिरात एक पगडी आणि सभेच्या ठिकाणी एक पगडी घालण्यात येणार आहे असे चित्र स्पष्ट झाले आहे.सदर दोन्ही पगड्या पुण्यातील प्रसिद्ध मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडे बनविण्यात आल्या आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!