ताज्या घडामोडी

मळवंडी ढोरे शाळेस आयएसओ मानांकन प्राप्त…

५४, प्रकारच्या सर्व बाबींचे परीक्षण करून, शाळेला आयएसओ प्रमाणपत्र देण्यात आले.

मावळातील, मळवंडी ढोरे शाळेस आयएसओ मानांकन प्राप्त…

आवाज न्यूज : मावळ प्रतिनीधी, जिल्हा परिषदेच्या मळवंडी ढोरे शाळेस नुकतेच आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.शालेय स्वच्छता, शौचालय वापर, शुद्ध पाणी, बोलक्या भिंती, शालेय कागदपत्रे,परस बाग,औषधी वनस्पती, शालेय रंगरंगोटी, विद्यार्थी वाहनतळ, वाचनालय,ग्रंथालय, प्रयोगशाळा, ज्ञानरचनावाद,स्मार्टबोर्ड,
ई लर्निंग सुविधा, हँडवाँश, साहित्य कोपरे, घनकचरा व्यवस्थापन, गांडूळखत प्रकल्प, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, विविध खेळ अशा ५४ प्रकारच्या सर्व बाबींचे परीक्षण करून शाळेला आयएसओ प्रमाणपत्र देण्यात आले.

बौर केंद्रातील सर्व अकरा शाळा आय एस ओ मानांकित झाल्याबद्दल केंद्राचे केंद्रप्रमुख झंपू ताते यांचा विशेष सन्मान मळवंडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.मानांकन प्राप्त करण्यासाठी विशेष आर्थिक योगदान देणारे शालेय व्यवस्थापन समिती, अध्यक्ष सिताराम गायकवाड,गोरख ढोरे, मारुती ढोरे, निर्गुण जाधव,पोपट ढोरे व सर्व सदस्य यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

तसेच शाळेचे मुख्याध्यापक राजू भेगडे,सोमलिंग रेवणशेट्टे,साधना बो-हाडे, पूजा राऊत या सर्व शिक्षकांचे गावाच्या वतीने आभार मानण्यात आले.गोरख ढोरे यांनी मनोगत व्यक्त करताना शाळेतील सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.सूत्रसंचालन सोमलिंग रेवणशेट्टे यांनी तर आभार साधना बो-हाडे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!