ताज्या घडामोडी
भराव खचल्याने ढंपर उलटला ; रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह?
भराव खचल्याने ढंपर उलटला ; रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह?
आवाजन्यूज: कामशेत-उकसान रस्त्यावर नाणे पुलाजवळ पुराचे पाणी साचून दरवर्षी वाहतूक दोन-तीन दिवस ठप्प होत असे.त्यावर उपाय म्हणून प्रशासनाने रस्त्यावर भराव टाकून रस्त्याची उंची वाढवली परंतु योग्य पध्दतीने काम न झाल्याने व अर्धवट अवस्थेत असलेल्या कामामुळे अपघाताचा धोका वाढला आहे.
नुकताच केलेल्या भरावाने रस्ता अरुंद झाला आहे, त्यामुळे अवजड मालवाहतूक करणारा ढंपर उलटला आहे.नागरिकांनी रस्त्याच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले व भविष्यात अशी दुर्घटना होऊ नये म्हणून प्रशासनाने योग्य ते पाऊल टाकले गेले पाहिजे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.