ताज्या घडामोडी

पॉस्को कंपनीच्या वतीने, नवलाख उंब्रे. येथे वृक्षारोपण!!

पॉस्को आय. पी. पी. सी. चे डायरेक्टर एस. एच. किम, व सरपंच. सविता बधाले, यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न.

पॉस्को कंपनीच्या वतीने, नवलाख उंब्रे. येथे वृक्षारोपण!!

      पॉस्को आय. पी. पी. सी. चे डायरेक्टर एस. एच. किम, व सरपंच. सविता बधाले, यांच्या प्रमुख उपस्थितीत  वृक्षारोपण संपन्न.

आवाज न्यूज:नवलाख उंब्रे.येथील पॉस्को इंडिया पुणे प्रोसेसिंग सेंटर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि ग्रामपंचायत नवलाख उंब्रे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून श्री राम मंदिर परिसरात मोठया प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. पॉस्को आय. पी. पी. सी. चे डायरेक्टर एस. एच. किम, सरपंच. सविता बधाले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या पर्यावरण पूरक उपक्रमात विविध जातीच्या शेकडो वृक्षाचे रोपण करण्यात आले.झाडांमध्ये उचित अंतर ठेऊन, खड्डे घेऊन, लाल मातीचा वापर करून तसेंच संरक्षक पिंजरे लावण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे स्टाफ मॅनेजमेंट पदाधिकारी व ग्रामपंचायतीचे सदस्य उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!