ताज्या घडामोडी

श्रीया क्रिएशन निर्मित कैवल्यवारी या आल्बम प्रकाशन प्रसंगी भजनसम्राट , मावळभूषण नंदकुमार शेटे यांचा सपत्निक सत्कार.

श्रीया क्रिएशन निर्मित कैवल्यवारी या आल्बम प्रकाशन प्रसंगी भजनसम्राट , मावळभूषण नंदकुमार शेटे यांचा सपत्निक सत्कार करताना विठ्ठल रूक्मिणी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर,आमदार उल्हासदादा पवार आणि मान्यवर.

आवाज न्यूज:लोणावळा ता.२९(प्रतिनिधी ) श्रिया क्रिएशन निर्मित कैवल्यवारी या भाक्तीगीताच्या आल्बम प्रकाशन प्रसंगी भजनसम्राट , मावळभूषण नंदकुमार शेटे यांचा सपत्निक सत्कार पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर देवस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर,आमदार उल्हासदादा पवार या जेष्ट पदाधिकारी धवलदादा आपटे यांचे हस्ते स्मृतिचिन्ह , शाल,पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रसिध्द संगीतकार कल्याणजी गायकवाड , पं.शौनक अभिषेकी ,पं.आनंद भाटे, गायिका व महाराष्ट्रातील लाडकी गायिका कार्तिकी गायकवाड , संगीत संयोजक कमलेश भडकमकर , श्रिया क्रिएशन यांचे संचालक पञकार जितेंद्र गोळे , संचालिका.वर्षा हुंजे , आदी मान्यवर उपस्थित होते.
मावळभूषण , भजनसम्राट नंदकुमार शेटे व आशाताई नंदकुमार शेटे या दांपत्याने जेष्ट कीर्तनकार वैकुंठवासी किसन महाराज शेटे आणि मृदूंगाचार्य वैकुंठवासी दत्तोबा शेटे यांचा भजनाचा वसा , वारसा पुढे चालू ठेवल्याबद्दल हा सत्कार करण्यात आल्याचे पंढरपूर श्री विठ्ठल रूक्मिणी देवस्थानचे अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर यांनी गौरवउद्गार काढले.. यावेळी मान्यवरांनी कैवल्यवारी या दहा भक्तीगीतांच्या आल्बममुळे पंढरीची पायी वारी कशी होते , तिचे गीतामधून दर्शन घडते,आसे सांगितले . या आल्बममधे मान्यवरांनी गीते गायली आहेत.पं.शौनक आभिषेकी , महाराष्ट्रातील लाडकी कार्तिकी गायकवाड , पं.आनंद भाटे , गायक आवधूत गांधी यांची भक्तीगीते यात आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!