ताज्या घडामोडी

किशोर भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिर संपन्न

एम्स हॉस्पिटलच्या 22 तज्ञ डॉक्टरांची टीम यावेळी उपस्थित होती.

किशोर भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य शिबिर संपन्न

आवाज न्यूज:तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व तळेगाव दाभाडे शहराचे स्वच्छतेचे जनक म्हणून परिचित असणारे किशोर भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिरास  नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शेकडो गरजू रुग्णांच्या तपासण्या, आवश्यक असल्यास चष्याचे वाटप करण्यात आले. एकाच छताखाली अनेक आजारांच्या तपासण्या  मोफत असल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.

कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून व छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून करण्यात आली. पुणे औंध येथील एम्स हॉस्पिटलच्या 22 तज्ञ डॉक्टरांची टीम यावेळी उपस्थित होती.

या शिबिरामधे सर्व वयोगटातील नागरिकांची तपासणी केली गेली शिवाय महिलांसाठी स्पेशल स्वतंत्र कक्ष व महिला डॉक्टर उपस्थित असल्याने सर्व महिला वर्गाची  तपासणी झाली..

सदर शिबिरामध्ये साधारण साडेचारशे चष्मे वाटप करण्यात आले तर साधारण बाराशे रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये प्रमुख नेत्रतपासणी पाचशे रुग्ण इतर लहान मोठ्या आजारांचे सातशे रुग्णाची. तपासणी करण्यात आली.

 

किशोरभाऊ भेगडे मित्र परिवारातील अभीजीत बोधे, सुरेश शिंदे, ललीत पवार किरण सलागरे यांनी तळेगावातील रुग्णांनी जास्तीत जास्त संख्येने यामध्ये लाभ घ्यावा असे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक तळेगावकरनी शिबिराला उत्स्फूर्त असा पतिसाद दिला.

मावळ राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे,  मा.राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष  विठ्ठल शिंदे,  तळेगाव शहर  राष्ट्रवादी  काँग्रेस  अध्यक्ष गणेश काकडे ,आशिष  खांडगे बाबा मुलाणी, रोटरी  क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे, नगरसेवक अरुण माने, नगरसेवक संतोष भेगडे, जेष्ठ माजी नगरसेवक डॉ.अनिल ऊनकुले व इतर मावळ भागातील अनेक मित्रपरिवार व सामाजिक शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. संयोजक बापूसाहेब भेगडे युवा मंच व किशोरभाऊ भेगडे मित्रपरिवार यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये अमित भेगडे, दिलीप राक्षे, विनय भेगडे, अभिजीत भेगडे, माजी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे   यांंनी परिश्रम घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!