ताज्या घडामोडी

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच….विनायक राऊत

20 वर्षांपासून बाळासाहेब ठाकरेंसाठी एकनिष्ठ राहिलो. तरी मला अशी वागणूक दिली जात आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील

शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच….

आवाज न्यूज मुंबई प्रतिनिधी:   शिवसेनेचे उपनेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, सामना दैनिकात आलेली बातमी ही अनावधानाने छापण्यात आली आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिवसेनेतच आहेत. ते शिवसेना उपनेता म्हणून कार्यरत असल्याचा खुलासा शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. ही माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना फेसबुकवरुन आढळराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा’ अभिनंदन मुख्यमंत्री साहेब. असा आशयासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचा फोटोही आढळरावांनी टाकला आहे. या शुभेच्छा दिल्यानेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी त्यांची थेट शिवसेनेतून हकालपट्टी करण्याचं पाऊल उचलल्याचं बोललं जात होतं. शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी सामना या मुखपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली होती. आढळराव पाटील यांची फेसबुक पोस्ट ही पक्षविरोधी असल्याचा ठपका ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याचे सकाळीच वृत्त समजताच आढळरवांना देखील धक्का बसला होता. मात्र, ते शिवसेनेतच असल्याचे विनायक राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

गेल्या 20 वर्षांपासून बाळासाहेब ठाकरेंसाठी एकनिष्ठ राहिलो. तरी मला अशी वागणूक दिली जात आहे. कोणीही सांगावं मी कोणती पक्ष विरोधी कारवाई केली. माझी झालेली हकालपट्टी ऐकून मी खूप दुःखी झालो असल्याचे वक्तव्य शिवसेने उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलं. आता हकालपट्टी केली नाही, असं पत्र पाठवलं आहे. पण काय फायदा झाला त्याचा. यातून माझी राज्यभर बदनामी झाली त्याचं काय? 20 वर्ष निष्टेनं काम केली त्याचं हे फळ मिळालं. पक्षात आज माझी काय किंमत आहे हे मला समजलं असेही आढळराव पाटील म्हणाले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!