ताज्या घडामोडी

कारागृहे ही  सुधारगृहे व्हायला हवीत त्यादृष्टीने भोई प्रतिष्ठान, आदर्श मित्र मंडळ यांनी आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन, पुणे जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश संजय देशमुख!!

गुन्हेगार हा जन्मजात गुन्हेगार कधीच नसतो, बऱ्याचदा परिस्थितीनुसार ,अनवधानाने, रागाच्या भरात त्याच्या हातून गुन्हा घडतो. पण त्याला सुधारण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे आवश्यक......

कारागृहे ही  सुधारगृहे व्हायला हवीत त्यादृष्टीने भोई प्रतिष्ठान, आदर्श मित्र मंडळ यांनी आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन, पुणे जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश संजय देशमुख!!
आवाज न्यूज पुणे प्रतिनिधी ४|७|२०२२|  गुन्हेगार हा जन्मजात गुन्हेगार कधीच नसतो, बऱ्याचदा परिस्थितीनुसार ,अनवधानाने, रागाच्या भरात त्याच्या हातून गुन्हा घडतो. पण त्याला सुधारण्यासाठी समाजाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. कारागृहातून बाहेर पडताना तो चांगली व्यक्ती म्हणून बाहेर पडणे गरजेचे आहे. त्यामुळे कारागृहे ही  सुधारग्रूहे व्हायला हवीत त्यादृष्टीने भोई प्रतिष्ठान, आदर्श मित्र मंडळ यांनी आदर्श निर्माण केला आहे असे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे प्रमुख न्यायाधीश श्री संजय देशमुख यांनी व्यक्त केले.
कारावासाची शिक्षा भोगून बाहेर आलेल्या गुन्हेगारांच्या पुनर्वसनासाठी भोई प्रतिष्ठान व आदर्श मंडळ यांच्या वतीने गेली सहा वर्षे प्रेरणा पथ उपक्रम सुरु आहे याअंतर्गत  बालाजी मोरे  याला शिक्षा भोगून आल्यानंतर चहा व स्नॅक्स स्टॉल सुरू करून देण्यात आला. त्याचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. या  याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कारागृह  कारागृह सुधार सेवा व पुनर्वसन विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक डाॅ सुनील रामानंद, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई ,अप्पर पोलीस आयुक्त श्री नामदेव चव्हाण , अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, येरवडा मध्यवर्ती कारागृह अधीक्षक, राणी भोसले ,सहाय्यक पोलीस आयुक्त, सतीश गोवेकर, कोर्ट  मॅनेजर डॉ.अतुल झेंडे, सामाजिक कार्यकर्ते एड.प्रताप परदेशी, शिवराज कदम ,शिक्षणतज्ञ सुधाकर जाधवर ,थोर गणेशभक्त शिरीष मोहिते ,आदर्श मित्र मंडळाचे संस्थापक उदय जगताप, ज्येष्ठ कायदेतज्ञ अॅड. राणी कांबळे, अॅड. चित्रा जानुगडे आदी मान्यवर उपस्थित होते.
 शिक्षा भोगून बाहेर येऊन नवीन आयुष्याची सुरुवात करणारे    बालाजी मोरे म्हणाले की मला एका गुन्ह्यात दहा वर्षाची सजा लागली होती, पण चांगल्या वर्तणुकीमुळे मला सात वर्षात मी बाहेर आलो. आता मी सुधारलो असून उदरनिर्वाहासाठी डॉ. मिलिंद भोई यांनी मला चहाचा स्टॉल सुरू करून दिला आहे. तसेच यासाठी मला विजय शिवाजी तरुण मंडळ यांनीमदत केली आहे त्यांच्या मी मनापासून कृतज्ञ आहे .
   महाराष्ट्र राज्य कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक  सुनील रामानंद म्हणाले की गुन्हेगार सुधारण्यासाठी त्याच्या कुटुंबाचा भविष्याचा विचार करून या बंद्याना  समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रेरणा पथ उपक्रम हा पथदर्शी ठरत असून लवकरच हा संपूर्ण राज्यभर राबवण्यात येण्यासंबंधी विचार करण्यात येणार आहे. महात्मा गांधींनी देखील कैद्यांना सुधारणा करण्यासाठी अनेक सूचना सुचविलेल्या होत्या. “दो आखे बारा हात” हा चित्रपट डोळ्यासमोर ठेवून हा प्रकल्प काम करीत आहे. म्हणून मी डॉक्टर मिलिंद भोई आणि उदय जगताप यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या पाठीशी कारागृह प्रशासन सदैव व ठामपणे उभे राहील.
      कार्यक्रमाचे संयोजक भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. मिलिंद भोई यांनी कार्यक्रमाचे आयोजनाची भूमिका स्पष्ट करताना बंदी बांधवांना समाजात मानाचे स्थान मिळावे व पुढे त्यांची गुन्हेगारीकडे वळणारी पावले ही चांगल्या मार्गात वळावी यासाठी हा प्रकल्प कार्यरत असल्याचे सांगून आत्तापर्यंत बंदी बांधवांना चप्पल चे दुकान ,ऑर्केस्ट्रा ,जर्सी गाय ,कटिंग चे दुकान असे उपक्रम सुरू करून देण्यात आल्याची माहिती याप्रसंगी देऊन बंदयांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आणि शिक्षणासाठी विशेष उपक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
   पुणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण यांचे या उपक्रमात विशेष सहकार्य लाभले .विजय शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र पवार, साईनाथ माने,  नवनाथ परदेशी, प्रेरणा प्रतिष्ठान ग्रुप ,गौतम कांबळे फाउंडेशन यांनी या कार्यक्रमाचे आयोजनात विशेष सहकार्य केले. शुक्रवार पेठ पोलिस चौकी समोर हा कार्यक्रम संपन्न झाला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!