ताज्या घडामोडी

मावळ तालुक्यातील बधालेवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आषाढी एकादशीचे औचित्य साधून चिमुकल्यांनी काढली बालदिंडी .

मुलांच्या या बालदिंडीत पालकांनीही सहभाग घेतला.टाळ-मृदुंगाच्या गजरात सर्व परिसर विठ्ठलमय झाला..

मावळ तालुक्यातील बधालेवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आषाढी एकादशीचे औचित्य साधून चिमुकल्यांनी बालदिंडी काढली.

.यावेळी काही विद्यार्थी हे विठ्ठलाच्या वेशभूषेत तर काही संतांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते.विठूनामाचा गजर करत गावाला प्रदक्षिणा घालण्यात आली.मुलांच्या या बालदिंडीत पालकांनीही सहभाग घेतला.टाळ-मृदुंगाच्या गजरात सर्व परिसर विठ्ठलमय झाला होता.

अभंग,ओव्या म्हणत ही दिंडी पुन्हा शाळेमध्ये आल्यानंतर फेर,फुगड्या यांमध्ये बालचमू हरवून गेले होते.लहानग्यांच्या भक्तीमय उपक्रमात सरपंच सविता बधाले,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण जाधव,उपाध्यक्षा वृषाली बधाले,अंगणवाडी सेविका गौरी बधाले,रामनाथ बधाले,शिक्षक हिरामण बधाले,विठ्ठल बधाले,देविदास बधाले,सचिन बधाले,गणपत जाधव यांनी सहभाग घेतला.संत परंपरेचे महत्व विद्यार्थ्यांना समजण्यासाठी या बालदिंडीचे आयोजन केल्याचे मत मुख्याध्यापक भरत शेटे यांनी व्यक्त केले.बधालेवस्ती शाळेच्या या उपक्रमाचे नवलाख उंबरे परिसरात कौतूक होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!