ताज्या घडामोडी

म्हाळसकर परिवाराने दिला दशक्रिया विधीतून समाजाला आरोग्य विषयक जनजागृतीचा संदेश”

“म्हाळसकर परिवाराने दिला दशक्रिया विधीतून समाजाला आरोग्य विषयक जनजागृतीचा संदेश”

आवाज न्यूज:वडगाव १२- मावळ येथील म्हाळसकर परिवारातील जेष्ठ सदस्य कै.शंकर गंगाराम म्हाळसकर, यांच्या दशक्रिया विधी, निमित्त त्यांच्या कुटुंबीयांनी मावळ तालुक्यात प्रथमच समाजाला “अध्यात्मिक” प्रबोधना बरोबरच,आरोग्य विषयक प्रबोधन व जनजागृती व्हावी या उद्देशाने “प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ.अभयजी खोडे” तसेच डॉ. राजकुमार शहा, यांचे हृदयविकार व त्यावर घ्यावयाची ,काळजी तसेच उपचार आणि लक्षणे हे प्रात्यक्षिकां सह सविस्तर मार्गदर्शन पर कार्यक्रम “वैकुंठ स्मशान भूमी” वडगाव मावळ येथे घेण्यात आला होता.

गेल्या दहा दिवसांपूर्वी कै.शंकर गंगाराम म्हाळसकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मित निधन झाले होते.
यामुळे कुटुंबीयावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असताना ही त्यांच्या मुलांनी.दत्तात्रय शंकर म्हाळसकर,श्री.रुपेश शंकर म्हाळसकर,.ज्योती सागर शेलार, यांनी आपल्या शोक भावनांना बाजूला ठेवून ज्या कारणास्तव आपल्या वडिलांचे आकस्मित निधन झाले त्या आजारावरती समाजाला जागृत करण्यासाठी कोणतेही “अध्यात्मिक प्रवचन” तसेच महाराजांना निमंत्रित न करता व या सर्व गोष्टींना फाटा देऊन हृदयविकाराविषयी व्याख्यानाचे, आयोजन करून समाजापुढे एक वेगळा आदर्श ठेवण्याचे काम कुटुंबीयांनी केल्याने हा दशक्रिया विधी सर्वत्र चर्चेचा विषय ठरला.यावेळी कुटुंबीयांच्या वतीने कोणतेही आर्थिक देणगी न देता;वैचारिक देणगी म्हणून हृदयविकार मार्गदर्शक पुस्तिकेचे, उपस्थित नागरिकांना वाटप करून त्यांच्या शरीरातील “कोलेस्ट्रॉलचे” प्रमाणाची तपासणी करण्यात आली या दशक्रिया प्रसंगी
मा.राज्यमंत्री नामदार बाळाभाऊ भेगडे,भाजप नेते बाबाराजे जाधवराव,नगरसेवक सचिन चिखले,नगराध्यक्ष मयूर ढोरे, डॉ.संजय गायकवाड,भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर,मा.सभापती गुलाबराव म्हाळसकर,संदीप सातव,संभाजी म्हाळसकर,अनिल धर्माधिकारी, तानाजी तोडकर,सुनील शिंदे,रमेश पंजाबी,विजय जाधव,डॉ.संदीप परदेशी, सुरेश जाधव उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!