ताज्या घडामोडी

भुशी डॕम चे धबधब्यात पडून बुडालेल्या पर्यटकाचा मृत्यू ;मृतदेह शोधण्यात यश..

 

भुशी डॕम चे धबधब्यात पडून बुडालेल्या पर्यटकाचा मृत्यू ;मृतदेह शोधण्यात यश..
लोणावळा ता.१२(प्रतिनिधी ) भुशी डॕम चे धबधब्यात पडून बुडालेल्या पर्यटकाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना काल सोमवारी घडली काल सायंकाळी पाच वाजता पाण्यात बुडालेल्या पर्यटकाचा शोध राञी आठपर्यत सुरू होता. आज सकाळी शिवदुर्ग मिञचे टीमने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आल्याचे शहर पोलिसांकडून सांगण्यात आले.
साहील जगदिश सरोज (वय-१९,रा-मुंबई ) असे मृताचे नाव आहे.
सोमवारी मुंबईहून एका काँपुटर क्लासेसचे सुमारे २५० विद्यार्थी विद्यार्थीनी लोणावळ्यात फिरायला आले होते.. भुशीडॕमचे पाठीमागे असलेल्या गिधाड तलावातील पाण्याच्या फेसाळणा-या धबधब्यात दोघेजण गेले होते.त्यातील साहील हा पाण्यातून वीस पंचवीस फूट खाली पाण्यात पडला आणि बेपत्ता झाल्याचे एका मिञाने सांगितल्यावर लोणावळा शहर पोलिस निरिक्षक सिताराम डुबल यांनी तात्काळ महिला पोलिस उपनिरिक्षक शिंदे यांचेसह सहकारी यांचे सहाय्याने आणि शिवदुर्ग मिञचे मदतीने बेपत्ता झालेल्या तरूण पर्यटकाचा शोध सुरू केला.राञीच्या आठपर्यत तो मिळाला नाही.
आज सकाळी आठ ते नऊ दरम्यान मृतदेह पाण्याबाहेर काढण्यासाठी शिवदुर्ग मिञ चे टीमला यश आले.
शहर पोलिस निरिक्षक सिताराम डुबल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिसउपनिरिक्षक सौ.शिंदे यांचेकडून खंडाळा येथे डाॕक्टर यांचेकडून शवविच्छेदन करण्यात येवून तो नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
लोणावळा शहर पोलिसांकडून पर्यटकांना दिलेल्या सुचना यांचे पालन करण्यात येत नाही.त्याकडे कानाडोळा करून पर्यटक जीव धोक्यात घालतात,त्यामुळे असे अपघात वारंवार दरवर्षी होत असतात. आजतागायत अनेक पर्यटकांचा भुशीडॕमचे पाण्यात आणि धबधबे , दरी या ठिकाणी अपघातात मृत्यू झाले आहेत.
कालअखेर ५९.९२ इंच १५२२ मी.मीटर लोणावळ्यात झाला.
काल २२० मी.मीटर (८.६६इंच ) पाऊस लोणावळ्याचे परिसरात झाला ..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!