जागतिक सर्प दिनानिमित्त वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला अत्यावश्यक सेवेतील साहित्य भेट..
आज जागतिक सर्प दिनानिमित्त रमाकांत नायडू यांच्याकडून त्यांना अत्यावश्यक सेवेत लागणारे साहित्य भेट देण्यात आले
जागतिक सर्प दिनानिमित्त वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला अत्यावश्यक सेवेतील साहित्य भेट..
तळेगाव दाभाडे येथील वन्यजीव रक्षक मावळ संस्था ही मावळ्यातील अनेक ठिकाणी आपले जीव धोक्यात घालून काम करताना दिसत असते समाजातील अनेक दानशूर व्यक्तीकडून त्यांना वेगवेगळी प्रकारची मदत होत असतानाच आज जागतिक सर्प दिनानिमित्त रमाकांत नायडू यांच्याकडून त्यांना अत्यावश्यक सेवेत लागणारे साहित्य भेट देण्यात आले त्याप्रसंगी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश गराडे
संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे,
संस्थेचे आपती व्यवस्थापन अध्यक्ष गणेश निसाळ सदस्य गणेश ढोरे किरण मोकाशी ,भास्करमाळी ,अविनाश कारले सत्यम सावंत, दीपक नळे ओमकार भेगडे, जिगर सोलंकी व इतर सभासद उपस्थित होते .
तळेगाव दाभाडे येथील रहिवाशी रमाकांत नायडू व इंद्रायणी नायडू यांच्यामार्फत अत्यावश्यक सेवेतील साहित्य भेट देताना इतिहास तज्ञ डॉक्टर प्रमोद बोराडे यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे कौतुक करताना म्हटले की रात्री बेरात्री अनेक ठिकाणाहून सर्प निघाल्याची किंवा एखादा प्राणी संकटात असल्याचा फोन येताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सभासद हे जीवाचे रान करून त्याला वाचवताना नेहमी दिसतात तर अनेक ठिकाणी बुडणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढण्याचे अत्यंत जोखमीचे काम हे जीव धोक्यात घालून करत असतात त्यामुळे वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे म्हणावे तेवढे कौतुक कमीच आहे.
तर विश्वास देशपांडे यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे काम सांगताना असे सांगितले की गेल्याच आठवड्यात कुंडमाळा येथे वाहत जाणाऱ्या तरुणाचे प्राण वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सभासदांनी आपल्या आपला जीव धोक्यात घालून वाचवले आहे त्यामुळे संपूर्ण मावळ तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात त्यांचे नाव पोहोचत आहे.
वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे काम हे वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर रमाकांत नायडू व त्यांच्या पत्नी इंद्रायणी नायडू यांनी अमित प्रभावळकर यांना संपर्क साधून त्यांच्या मार्फत वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सर्व सभासदांना हे साहित्य भेट दिले आहे असे साहित्य भेट देणारे रमाकांत नायडू यांनी सांगितले आहे.