ताज्या घडामोडी
कार्लाच्या श्री एकविरा देवीच्या गडावर भाविकांकडून गर्दीचा सागर उसळला..
भाजेतील धबधबा या ठिकाणी १४४ कलम लावल्यामुळे पर्यटकांनी व भाविकभक्तांनी श्रीएकविरा गडावर व पायथा मंदिराकडे मोर्चा वळविला...
कार्लाच्या श्री एकविरा देवीच्या गडावर भाविकांकडून गर्दीचा सागर उसळला..
Table of Contents
- कार्लाच्या श्री एकविरा देवीच्या गडावर भाविकांकडून गर्दीचा सागर उसळला..
- आवाज न्यूज:लोणावळा ता.१७(प्रतिनिधी ) कार्लाच्या श्री एकविरा देवीच्या गडावर भाविकांकडून गर्दीचा सागर उसळला होता.
- जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार भुशीडॕमचे बरोबरच लायन्स पाँईंट , टायगर पाँईंट ही पर्यटनस्थळे , व लोहगड , विसापूर , गडकिल्ले , भाजेलेणी , भाजेतील धबधबा या ठिकाणी १४४ कलम लावल्यामुळे पर्यटकांनी व भाविकभक्तांनी श्रीएकविरा गडावर व पायथा मंदिराकडे मोर्चा वळविला होता. या ठिकाणी प्रचंड गर्दीचा महासागर आज पहायला मिळाला. पोलिसांकडून पुरेसे वहातूक कोंडी सोडविण्यासाठी मनुष्यबळ न लावल्यामुळे भाविकांकडून वादावादी होताना दिसत होते.
- सार्वजनिक बांधकाम खात्याकडून कार्लाफाटा ते येवले निवास व समृद्धी हाॕटेलपर्यतच फक्त दुपदरी रस्ता करण्यात आल्याने आणि ओम हाॕटेल समोरच्या बाजूला वरच्या बाजूला पुरेशा गटाराचे बांधकाम न केल्याने सुमारे फुटभर पाणी रस्त्यावरून वाहताना दिसले .त्यामुळे वाहनचालकांना ञास सहन करावा लागत होता.. सुमारे सत्तर ऐशी हजार पर्यटक , भाविकांकडून आज दर्शनास गडावर गर्दी केल्याचे दिसले...