ताज्या घडामोडी

राष्ट्रपती पदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीबद्दल भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे , प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी आदिवासी बांधवांना लाडू भरवून आनंद केला साजरा ..

राष्ट्रपती पदी निवड झाल्याने त्यांच्या रूपाने देशाला प्रथमच आदिवासी महिला राष्ट्रपती लाभल्याने सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

राष्ट्रपती पदी श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीबद्दल भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे , प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी आदिवासी बांधवांना लाडू भरवून आनंद केला साजरा ..

आवाज न्यूज लोणावळा ता.२३(प्रतिनिधी ) मच्छिंद्र मांडेकर,

श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीबद्दल भाजपाचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे , प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांनी आदिवासी बांधवांना लाडू भरवून आनंद केला साजरा केला.
नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत भारतीय जनता पार्टी व सहयोगी पक्षाच्या उमेदवार श्रीमती द्रौपदी मुर्मू यांची प्रचंड बहुमताने राष्ट्रपती पदी निवड झाल्याने त्यांच्या रूपाने देशाला प्रथमच आदिवासी महिला राष्ट्रपती लाभल्याने सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

त्याच पार्श्वभूमीवर पवन मावळ येथील तालुक्यातील राऊतवाडी येथील आदिवासी पाड्यावर भारतीय जनता पार्टी मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे आणि प्रभारी भास्कर आप्पा म्हाळसकर यांनी पवन मावळातील सहकाऱ्यांसह आदिवासी बांधवांसोबत ठेका धरत लाडू वाटप करून आनंदोत्सव साजरा केला. त्याचप्रमाणे आज महाराष्ट्राचे अभ्यासू उपुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आदिवासी बांधवांना मिठाई वाटप करून देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होवो, अशी या निमित्ताने सदिच्छा व्यक्त केली. यावेळी प्रभु श्रीरामचंद्र आणि भारतमाता यांच्या प्रतिमेचे श्री.भेगडे आणि श्री.म्हाळसकर यांचे हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

याप्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती शांताराम कदम, यदुनाथ चोरघे, विठ्ठल दादा घारे, लोहगड विकास सोसायटी चेअरमन गणेश धानिवले, शंकर लोखंडे, जयवंत लोखंडे, राकेश लोखंडे, सुभाष दाहिभाते, काळूराम बरदाडे, तानाजी शेंडगे, दिलीप राऊत,नारायण बोडके,माऊली अडकर, गणेश ठाकर,संतोष जाधव, गणेश कल्हाटकर, अर्जुन शेडगे,संदीप पवार, प्रशांत लगड, निवृत्ती साठे,संदीप दळवी,विकास दळवी, रवि राऊत, पप्पू दाभाडे यांच्यासह आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!