ताज्या घडामोडी

हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम गायक स्वर्गीय मुकेशदा यांचा 22 जुलै हा शताब्दी जयंती दिन.

कराओके क्लब तळेगांव दाभाड़े, यांच्या वतीने तुमको न भूल पायेंगे ही गीतसुमनांजली, कलापीनी नाट्य संस्था तळेगाव दाभाड़े च्या प्रांगणात वाहण्यात आली.

आवाज न्यूज २५ जुलै तळेगाव दाभाडे प्रतिनिधी

हिंदी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम गायक स्वर्गीय मुकेशदा यांचा 22 जुलै हा शताब्दी जयंती दिन. त्यानिमित्त स्वर्गीय मुकेशदा यांना आदरांजली म्हणून कराओके क्लब तळेगांव दाभाड़े, यांच्या वतीने तुमको न भूल पायेंगे ही गीतसुमनांजली, कलापीनी नाट्य संस्था तळेगाव दाभाड़े च्या प्रांगणात वाहण्यात आली.

या सुमनांजली स्वर्गीय मुकेशदा यांचे सुमधुर, दर्दभरी व रुदयाचा ठाव घेणारी त्यांचे स्वरातील तीसरी कसम, उपकार, संगम, छलिया, अनोखी रात, मेरा नाम जोकर, आनंद, धरती कहे पुकारके, पहचान, मधुमती, सरस्वतीचंद्र, धरमात्मा, कभी कभी या प्रसिद्ध हिंदी चित्रपटातिल गाणी क्लब मधील गायक /गायिका  वरदा मातापुरकर, कुमारी धनश्री शिंदे, डॉक्टर प्राची पांडे, डॉक्टर शुभांगी साठे, योजना पळसुले देसाई, आदरणीय रानडे काका, वैद्य काका, फडणवीस काका, प्रदीप जोशी काका, सम्राट काशीद, राजीव कुमठे कर, पदनाभ पुरानीक, संजय देशमाने, प्रवीण ढोबळे इत्यादिन्नी गावून कार्यक्रमा मधे मोठी रंगत आणली.

या सर्व गायक /गायिकान्नी 2 ते अडीच तास सर्व गाणी अत्यंत उत्तमरितिने गाउन सर्व रसिक प्रेक्षकांना जागेवर खिळवून ठेवले होते. विशेषकरून महिला गायिकानी तर फारच सुंदर गाणी गायली. सदर कार्यक्रमास विशेष उपस्थिति, कलपिनी नाट्य संस्था मुख्य विश्वस्त डॉक्टर परांजपे यांची होती.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!