ताज्या घडामोडी

लोणावळा बसस्थानकात बससाठी आधिकृत थांबा असूनही बसचा शुकशुकाट ..

बसस्थानकामधून मुंबई , पुणे , तसेच राज्याच्या विविध शहरात जाणाऱ्या प्रवाशांना बसेस साठी थांबा द्यावा..

लोणावळा बसस्थानकात बससाठी आधिकृत थांबा असूनही बसचा शुकशुकाट ..
आवाज न्यूज लोणावळा ता.२५(प्रतिनिधी ) लोणावळा बसस्थानकात बससाठी आधिकृत थांबा असूनही बसचा शुकशुकाट पहायला मिळत आसून सुमारे तासा- दोन तासांनी एखादी बस येत असल्याने फेरीवाले आणि दुकानदारांना , हाॕटेलचालक यांचेवर उपासमारीची वेळ आली असून प्रवासी , यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे , येथून बससेवा पूर्ववत करावी , अशी मागणी मनसे शहराध्यक्ष भरतशेठ चिकणे यांनी केली आहे.

या बसस्थानकामधून आढावा घेतला असता शेकडो बसेस पंधरा , वीस मिनिटे थांबा घेण्यासाठी पूर्वी येत असता .आता बहुतांशी बसेस सेंटर पाँईंट जवळ , एन एच ०४ येथे थांबा घेतात , त्यामुळे तेथून उतरणारे बस प्रवाशी लोणावळ्याच्या रेल्वे स्टेशनला , बसस्थानकात , तसेच खरेदीसाठी सुमारे शंभर रूपये मोजून रिक्षाने शहरात येतात. सुमारे एक ते दीड किलोमीटर लांब बसेस थांबत आसल्याने येथे हाॕस्पिटल सुविधा मिळत नाही , की शाॕपिंग करता येत नाही,त्यामुळे हे अनधिकृत थांबे बंद करून , किंवा काही निर्बंध घालून लोणावळा ते स्वारगेट , पुणे स्टेशन,बोरिवली , वाशी , पनवेल , तसेच खोपोली बसेस तसेच पौड , भांबर्डे , कार्ला , भाजे , बसेस चालू कराव्यात ..
बसस्थानकात अधिकृत बसेस थांबत नसल्यामुळे फेरीवाले , , हाॕटेलमधे काम करणारे कामगार यांना रोजचा रोजही निघत नाही. उपासमार होते.

या बसस्थानकामधून बस बंद केल्यामुळे आधीच कोरोनाच्या लाॕकडाऊन च्या काळात आणि नंतर एस टी कामगारांच्या संपामुळे येथील हाॕटेलवाले , फेरीवाले , दुकानदारांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे नवीन सरकार स्थापन होऊन महिना होत आला , अजून परिवहन मंञी यां महत्त्वाचे खात्याचा कारभार कुणाकडे न दिल्याने बसस्थानकात बस येत नसल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे..येथे पूर्वी अनधिकृत पार्कींग करत असत , पण आता बसस्थानकात अनधिकृत पार्कींग करीता १ हजार दंड करण्यात येईल ,असा फलक लावल्यामुळे बेकायदा वाहने पार्कींग बंद झाले आहे . यामुळे राज्यसरकारने तात्काळ दखल घ्यावी , अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष भरतशेठ चिकणे यांनी केली..’
या बसस्थानकामधून मुंबई , पुणे , तसेच राज्याच्या विविध शहरात जाणाऱ्या प्रवाशांना बसेस साठी थांबा द्यावा , अशी मागणी फेरीवाले , दुकानदारांनी केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!