ताज्या घडामोडी

आमदार अशोक बापू पवार यांच्या नेतृत्वात पुणे महानगर पालिकेच्या विविध मागण्यांबाबत, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्यासोबत प्रदीर्घ बैठक संपन्न..

आवाज न्यूज: दि. २५ जुलै २०२२   आमदार अशोक बापू पवार यांच्या नेतृत्वात पुणे महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार यांच्यासोबत प्रदीर्घ बैठक झाली. सदरील बैठकीस वाघोली गावातील खालील समस्यांवर सखोल चर्चा झाली.

ड्रेनेज लाईनचे अपुर्ण काम, पाणी पुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, नगर रोड व काही अंतर्गत रोड वरील अतिक्रमण, बकोरी व फुलमळा रोड, नगर पुणे रोड वरील ट्रॅफिक जॅम, अद्ययावत रूग्णालयाची नितांत आवश्यकता, पीएमपीएमएल (PMPML) च्या बसेसच्या फेऱ्या वाढविणे तसेच नवीन रूट सुरू करणे, नवीन घरांच्या टॅक्स नोंदण्या आणि इतर अनेक विषयांवर चर्चा झाली.

सदरील बैठकीस वाघोली गावातील ज्येष्ठ नेते  रामभाऊ दाभाडे,  शिवदास उबाळे,  वसुंधरा उबाळे,  जयश्री सातव,  सुनील चाचा जाधवराव आणि वाघोलीतील काही गृहप्रकल्प संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!