ताज्या घडामोडी

भांगरवाडी येथील रस्त्याची खड्डेच खड्डे पडल्याने चाळण झाली; पाणी साचल्याने वाहनचालकांना मनस्ताप..

अपघात होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात येतआहे..

भांगरवाडी येथील रस्त्याची खड्डेच खड्डे पडल्याने चाळण झाली; पाणी साचल्याने वाहनचालकांना मनस्ताप ?

आवाज न्यूज:ता.२५ मच्छिंद्र मांडेकर (प्रतिनिधी ) भांगरवाडी येथील रस्त्याची खड्डेच खड्डे पडल्याने चाळण झाली :पाणी साचल्याने वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. येथे अपघात होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली.

लोणावळा शहरात वळकाईवाडी मार्गे हनुमान टेकडी जवळून कैलासनगर स्मशानभूमिचे बाजूने भुशीडॕमकडे जाणारा रिंगरोड विकसित करण्यात आला आहे.या रिंगरोड चे दोन्ही बाजूला दिशादर्शक सूचना फलक लावले आहेत. या भागात सध्या लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने भांगरवाडी येथील पांगशेचाळ येथील रस्त्याची चाळण झाली आहे.

पाणी साचलेल्या खड्ड्यांमधून सायकली , मोटारसायकल , तसेच रिक्षा ,कार , जीप यांची वाहतूक करणे , तसेच या खड्यांमुळे पायी चालणाऱ्या शालेय विद्यार्थी , कामगार , दुधवाले यांचे हाल होत आहेत.हा रस्ता तात्काळ तात्पुरती डांबरमिस्रीत खडी टाकून खड्डेमुक्त रस्ता करावा , आशी मागणी रिक्षाचालक , मोटारसायकलस्वार यांचेकडून करण्यात आली आहे. ..

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!