ताज्या घडामोडी

श्रीरंग कलानिकेतनचा ३७ वा वर्धापन दिन भरत नाट्यम शैलीतील नेत्रदीपक शास्त्रीय नृत्यरचनांनी संपन्न …..

श्रीरंग कलानिकेतन आणि गंधर्व सभा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या मासिक सभेच्या माध्यमातून सृजन नृत्यालयाच्या गुणी कलाकारांनी भरत नाट्यम शैलीतील शास्त्रीय नृत्यरचना सादर करून रसिकांची दाद मिळवली.

श्रीरंग कलानिकेतनचा ३७ वा वर्धापन दिन भरत नाट्यम शैलीतील नेत्रदीपक शास्त्रीय नृत्यरचनांनी संपन्न …..……….

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे विश्वास देशपांडे२६ जुलै

श्रीरंग कलानिकेतनचे सर्व कार्यक्रम गेल्या मार्च २०२० पासून ठप्प झाले होते. गेल्या रविवारी कांतीलाल शहा विद्यालयाच्या सभागृहात श्रीरंग कलानिकेतनचा ३७ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला. संस्थेचे संस्थापक कै.पं. शरदराव जोशी काकांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून संस्थेचे विश्वस्त विश्वास देशपांडे, उपाध्यक्ष राजीव कुमठेकर, सचिव विनय कशेळकर, खजिनदार दीपक आपटे,कार्यकारिणी सदस्या संपदा थिटे आणि सृजन नृत्यालयाच्या संचालिका डॉ.मीनल कुलकर्णी यांचे हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाला सुरुवात झाली.
श्रीरंग कलानिकेतन आणि गंधर्व सभा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या मासिक सभेच्या माध्यमातून सृजन नृत्यालयाच्या गुणी कलाकारांनी भरत नाट्यम शैलीतील शास्त्रीय नृत्यरचना सादर करून रसिकांची दाद मिळवली.

‘मी, नृत्याचं प्राथमिक शिक्षण गुरू श्री. उज्ज्वल भोळे यांच्याकडे श्रीरंग कलानिकेतनच्या माध्यमातून सुरू केलं..स्वतःचे सृजन नृत्यालय सुरू केल आणि आज माझ्या शिष्या समर्थपणे नृत्य रचना सादर करताना पाहून खूपच आनंद होतोय..एक वर्तुळ पुर्ण झाल्याचा आनंद मिळतोय’, अश्या भावना सृजन नृत्यालयाच्या संचालिका नाट्य अभ्यासक डॉ. मीनल कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या.
तेजस माने याचे विनायक कौतुकम् व कालभैरवाष्टकम् , अनुजा झेंडचे . तोडयमंगलम् हरिज्ञा बांदलचे शिवतांडव, शरयु पवनीकर च्या ‘हरी तुम हरो( मीरा भजन) व तिल्लाना राग कदनकुतुहलम् ,
तेजस्विनी गांधीचे कालिंग नर्तनम् या एका पेक्षा एक नेत्रदीपक नृत्यरचना रसिकांना वेगळीच अनुभूती देत होत्या. नृत्यरचनांनी सभागृह भारावून गेले होते. नृत्य रचनांचे अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन डॉ. मीनल कुलकर्णी यांनी करून रसिकांना प्रत्येक प्रस्तुती पूर्वी सविस्तर व उद्बोधक माहिती दिली.

संस्थेचे उपाध्यक्ष राजीव कुमठेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर विश्वास देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सुंदर ध्वनी संयोजन रसिक साउंड चे केदार अभ्यंकर यांनी केले व गौरव चेपे यांनी छायाचित्रण केले.
या सुंदर कार्यक्रमाचे उत्तम संयोजन , दिपक आपटे, निंबळे सर, सीमा आवटे, प्रदीप जोशी, राजीव कुमठेकर, संपदा थिटे सुनील सोनार, सुनील वाघमारे, किरण पळसुलेदेसाई आणि विनय कशेळकर यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!