ताज्या घडामोडी

कामशेत मध्ये आढळले कोरोना रूग्ण….

कामशेत मध्ये तीन कोरोना रूग्ण अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मिळाली..

आवाज न्यूज:कामशेत प्रतिनिधी शिवानंद कांबळे २८ जुलै.

कामशेत मध्ये आढळले कोरोना रूग्ण
कामशेत मध्ये तीन कोरोना रूग्ण अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मिळाली

काल दोन व आज एक.कोरोना रूग्ण सापडले. मुंबई पुणे सारख्या शहरात वाढती कोरोना रूग्णांची संख्या हे चिंतेचे कारण असून ग्रामीण भागात सुध्दा कोरोनाचे रूग्ण सापडत आहे. गेले काही महिने कामशेत शहर व परिसर हा कोरोना मुक्त झाला होता कोरोना संदर्भातील सर्व नियम शिथिल झाल्याने लोक ही बिनधास्त पणे वावरत होती.

पण शहरा बरोबर ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केला. नागरिक नोकरी उद्योग व्यवसायासाठी पुणे मुंबई शहराकडे जात असतात.यांच्या मार्फत कोरोना झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे कामशेत मधील हे तीन रूग्ण यांना प्राथमिक लक्षणे दिसून आली आहे.  त्यानां घरीच आयसोलेशन केले आहे त्यांची लक्षणे प्राथमिक स्वरूपाची आहे घाबरण्याचे कारण नाही.

आता लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी,मास्क लावावे, सोशल डिस्टन्स पाळावे‌,जेणे करून कोरोना ची लक्षणे जाणवत असेल तर त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र येथील  वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घेऊन औषध उपचार करावा अशी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्रा कडून माहिती देण्यात आली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!