ताज्या घडामोडी

सीईटी ला जाता जाता” या विषयावर मावळातील विद्यार्थ्यांना मिळाले मार्गदर्शन…

नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा, नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च च्या प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

सीईटी ला जाता जाता” या विषयावर मावळातील विद्यार्थ्यांना मिळाले मार्गदर्शन…

आवाज न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी २ ऑगष्ट

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ यांच्या वतीने बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय येथे ” सीईटी ला जाता जाता” हे मार्गदर्शनपर चर्चासत्र नुकतेच पार पडले . या चर्चासत्रास सुप्रसिद्ध करिअर मार्गदर्शक आणि तज्ञ वक्ते प्रा. विवेक वेलणकर, रजत अकॅडमीचे संचालक प्रा. चंद्रशेखर निकम, प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या प्रसंगी नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय चे प्राचार्य डॉ. ललितकुमार वधवा, नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च च्या प्राचार्या डॉ. अपर्णा पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

” विद्यार्थ्यांनी बिनधास्तपणे सीईटीच्या परीक्षेस कसे सामोरे गेले पाहिजे, वेळेचे नियोजन व व्यवस्थापन कसे केले पाहिजे, परीक्षा देताना कोणती काळजी घेतली पाहिजे, परीक्षा काळात आपल्या आरोग्याची काळजी घेऊनच परीक्षेस सामोरे गेले पाहिजे जेणे करून आपल्या पूर्व तयारीचा जास्त उपयोग होऊ शकतो, आदी विषयांवर प्रा. वेलणकर यांनी मार्गदर्शन केले.
प्रा. चंद्रशेखर निकम यांनी परीक्षेच्या तयारीचा प्राधान्यक्रम व एकत्रित अभ्यासाचे नियोजन कसे करायचे, शेवटच्या काही दिवसांत गुण वाढविण्यासाठी कसा अभ्यास करायचा याच्या ट्रिक्स आणि टिप्स अतिशय सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना सांगितल्या.

कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन डॉ. सागर शिंदे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. किरण जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालय आणि नूतन कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड रिसर्च च्या सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!