ताज्या घडामोडी

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव …

हर घर तिरंगा" अभियान अंतर्गत, हिंदविजय नागरी पतसंस्थेच्या वतीने, सभासदांसाठी तिरंगा ध्वज वाटप व मावळ तालुकास्तरीय "निबंध स्पर्धा" आयोजिण्यात आली आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हर घर तिरंगा” अभियान अंतर्गत हिंदविजय नागरी पतसंस्थेच्या वतीने सभासदांसाठी तिरंगा ध्वज वाटप व मावळ तालुकास्तरीय “निबंध स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे.

आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे प्रतिनिधी ८ ऑगष्ट.   

भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व पतसंस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचीत्य साधून दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधी मध्ये “हर घर तिरंगा” अभियान अंतर्गत आपल्या संस्थेच्या वतीने सभासदांसाठी तिरंगा ध्वज वाटप व मावळ तालुकास्तरीय “निबंध स्पर्धा” आयोजित करत आहोत. तरी या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी व नागरीकांनी सहभागी व्हावे अशी विनंती हिंदविजय नागरी पतसंस्थेकडून करण्यात येतआहे.

निबंध स्पर्धा विषय व गट

१) इ. ५ ते ७ वी : विषय – मी तिरंगा बोलतोय, शब्द मर्यादा १५० ते २०० शब्द

२) इ. ८ वी ते १० वी विषय मी सैनिक बोलतोय, शब्द मर्यादा २५० ते ३०० शब्द

३) खुला गट

स्वातंत्र्यासाठीचा संघर्ष व ७५ वर्षातील भारताची प्रगती

शब्द मर्यादा ४०० ते ५०० शब्द

१) स्पर्धा ३ गटात घेण्यात येईल व प्रत्येक गटात प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक काढले जातील.

२) स्पर्धकांनी आपले निबंध मराठी मध्ये फुलस्केप पानाच्या एकाच बाजूला स्वहस्ताक्षरात लिहावा. व निबंधाचे शेवटी स्वतःचे नाव, इयत्ता, शाळेचे नाव व मोबा. क्रमांक नमूद करावा.

३) स्पर्धकांनी आपले निबंध आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकाकडे दि. १२/८/२०२२ पर्यंत जमा करावेत.

४) खुल्या गटातील स्पर्धकांनी आपले निबंध पतसंस्थेच्या मुख्य कार्यालय व शाखा कार्यालयात दि. २२/८/२०२२ पर्यंत

सायं. ५ वा. पर्यंत जमा करावेत. ५) सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रशस्तीपत्र देण्यात येईल.

६) बक्षिस वितरण रविवार दि. १४/८/२०२२ रोजी हिंद विजय पतसंस्थेच्या तळेगांव दाभाडे येथील मुख्य कार्यालयात सकाळी १०.३० वा. होईल.

७) प्रत्येक गटातील विजेत्यास प्रथम क्र. रू.१५००/- द्वितीय क्र. स. १०००/- तृतीय क्र. रु.५००/ व उत्तेजनार्थ रू. २५०/- + ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देण्यात येईल.

हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्था 

ॲड. रविंद्रनाथ ज. दाभाडे (संस्थापक) मा. नगराध्यक्ष, तळेगांव दाभाडे न.प.,सुधाकर ग. देशमुख अध्यक्ष ॲड. संजय शं. वांद्रे कैलास रा. भेगडे, विभावरी र. दाभाडे खजिनदार सर्व संचालक, सल्लागार, यांनी माहिती आवाज न्यूज प्रतिनिधिंंना दिली.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!