ताज्या घडामोडी

शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवणे प्रशिक्षण शिबिर संपन्न कामशेत:- सह्याद्री विध्यार्थी अकादमी मावळ व लायन्स क्लब..

आपला बाप्पा आपणच बनवूया पर्यावरण वाचवूया..

शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवणे प्रशिक्षण शिबिर संपन्न

आवाज न्यूजः शिवानंद कांबळे, कामशेत प्रतिनिधी ८ऑगष्ट

सह्याद्री विध्यार्थी अकादमी मावळ व लायन्स क्लब कामशेत यांच्या विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनवणे प्रशिक्षण शिबिर गणेश मंगल कार्यालय कामशेत येथे झाले.
आपला बाप्पा आपणच बनवूया पर्यावरण वाचवूया अर्थात इको फ्रेंडली गणेशउत्सव या संकल्पनेनुसार
आपला बाप्पा आपण बनून आपल्या घरी त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.

सह्याद्री विध्यार्थी अकादमी मावळ यांच्या वतीने कामशेत येथे मागील 5 वर्षापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.व पर्यावरण जनजागृती विषयी संदेश देण्यात येत आहे यंदाचे हे सहावे वर्ष आहे असे मत आपल्या मनोगता मध्ये सह्याद्री विध्यार्थी अकादमी कामशेत मावळ चे संपर्कप्रमुख चेतन वाघमारे यांनी सांगितले.

उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलन व गणेश मूर्ती पूजन करून उदघाटन करण्यात आले.
जवळजवळ 150 विध्यार्थ्यांनी प्रशिक्षणात सहभाग नोंदवला आहे. उदघाटन सोहळ्या प्रसंगी मान्यवरांमध्ये प्रामुख्याने डॉ. विकेश मुथा, सुनील भटेवरा, अॕड. योगेश गायकवाड, राजू अगरवाल,गजानन शिंदे, अभिमन्यू शिंदे,वैशाली ताई इंगवले, विद्या ताई बेनगुडे,निलेश दाभाडे, गणपत शिंदे, परेश बरदाडे, आदी मान्यवर होते.

तसेच सह्याद्री विध्यार्थी अकादमीच्या वतीने सचिन शेडगे चेतन वाघमारे, सहदेव केदारी,किशोर वाघमारे, सदानंद पिलाणे,राजेंद्र सातपुते, निलेश गोडे, विशाल सुरतवाला, अंकुश काटकर, तेजस वाघवले, किरण ढोरे, संदीप जाधव, अमोल तिकोने, अश्विन दाभाडे किरण मराठे, चिन्मय गायकवाड,गणेश हजारें, संतोष कदम,अमर गवारे, बाळासाहेब जमादार,भाऊ ढाकोळ,आदीचे सहकार्य लाभले. तसेच प्रशिक्षणार्थी  म्हणुन  थोरात सर यांचे मार्गदर्शन झाले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक केदार डाखवे यांनी केले तर आभारप्रदर्शन देविदास आडकर सर यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक लक्ष्मण शेलार यांनी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!