ताज्या घडामोडी

नाणे मावळातील जिल्हा परिषद कांब्रे ना. मा. शाळेला ISO मानांकन प्राप्त..

आंतरराष्ट्रीय संस्था मानांकन ISO 9001:2015 प्रमाणपत्र  लक्ष्मीकांत साधू ऑडिटर आयएसओ मुंबई व धनराज कदम पाटील कन्सल्टंट आयएसओ पुणे यांच्या हस्ते कांब्रे ना.मा. शाळेला प्रदान..

नाणे मावळातील जिल्हा परिषद कांब्रे ना. मा. शाळेला ISO मानांकन प्राप्त..

आवाज न्यूज: शिवानंद कांबळे, मावळ  प्रतिनिधी.८ऑगष्ट.

मावळातील व खडकाळा शिक्षण विभागातील सर्वात प्रथम पहिली आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ मानांकन प्राप्त करण्याचा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कांब्रे ना.मा. ला बहुमान प्राप्त झाला आहे.

दिनांक 6 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय संस्था मानांकन ISO 9001:2015 प्रमाणपत्र  लक्ष्मीकांत साधू ऑडिटर आयएसओ मुंबई व धनराज कदम पाटील कन्सल्टंट आयएसओ पुणे यांच्या हस्ते कांब्रे ना.मा. शाळेला प्रदान करण्यात आले.

नाणे मावळातील एक दुर्गम भागातील शाळा असूनही आंतरराष्ट्रीय स्तरावरील शाळेची गुणवत्ता, भौतिक सुविधा व अद्ययावत शालेय रेकॉर्ड या सर्वांची पाहणी करून शाळेच्या मुख्याध्यापकांना आयएसओ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. आयएसओ मानांकन प्राप्त करण्यासाठी गटविकास अधिकारी भागवत साहेब,गटशिक्षणाधिकारी राक्षे साहेब यांच्या प्रेरणेने व केंद्रप्रमुख घोडके सर यांच्या विशेष उत्तेजनाने शाळेने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

प्रमाणपत्र प्रदान सोहळ्यासाठी मुख्याध्यापक रुक्मिणी देवडकर, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष- वनिता ताई काटकर, पोलीस पाटील -भारतीताई गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य – स्वामी भाऊ गायकवाड, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य- हेमलता गायकवाड विषय तज्ञ शिशुपाल मॅडम शाळेतील शिक्षक वर्ग माधव गुरव, कविता दंडवते, अंजनी जंगम, मेघा जंगम, मिराबाई गोडे, ज्योत्स्ना धडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!