ताज्या घडामोडी

अजित दादा पवार यांच्या हस्ते युवा नेते प्रसाद कोलते यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन..

प्रसाद कोलते यांनी यमुनानगर, निगडी तसेच शहर पातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटविला असून यापुढेही कोणत्याही प्रकारची समस्या आल्यास पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.

अजित दादा पवार यांच्या हस्ते युवा नेते प्रसाद कोलते यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.

आवाज न्यूज:  निगडी प्रतिनिधी. ८ ऑगष्ट 
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते आणि पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रसाद कोलते यांच्या यमुनानगर, निगडी येथील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटनप्रसंगी बोलताना अजित पवार म्हणाले की प्रसाद कोलते यांनी यमुनानगर, निगडी तसेच शहर पातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटविला असून यापुढेही कोणत्याही प्रकारची समस्या आल्यास पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. पिंपरी चिंचवड महापालिकेतील विविध योजना व प्रभागातील विविध कामे करण्यासाठी जनसंपर्क कार्यालयाची गरज आहे ती गरज ओळखून प्रसाद कोलते यांनी एक चांगले सुसज्ज कार्यालय तयार केले आहे. यमुनानगर, निगडी तसेच आसपासच्या परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रसाद कोलते यांचे जनसंपर्क कार्यालय खऱ्या अर्थाने जनसेवेचे प्रमुख केंद्र बनेल. असा विश्वास व्यक्त करीत पवार यांनी यावेळी प्रसाद कोलते आणि प्रियाताई कोलते यांच्या कार्याचे कौतुक केले. आणि त्यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दादां’ची क्रेझ…
महाराष्ट्राचे ‘ दादा ‘ म्हणून अजित पवार सर्वांना परिचित आहेत. विशेष म्हणजे सुरुवातीपासूनच त्यांची युवा कार्यकर्त्यांत मोठी क्रेझ आहे. अजित पवार यांच्या कामाची पद्धती , शिस्त तसेच कामाचा उरक याबाबींमुळे युवा कार्यकर्त्यांची संख्या त्यांच्या सोबत अधिक असते. आजच्या कार्यक्रमातही युवकांची संख्या मोठी होती. दादांची क्रेझ कायम असल्याचे यातून दिसून आले.

या कार्यक्रमाला शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्षा कविताताई आल्हाट, युवक प्रदेश कार्याध्यक्ष तथा प्रवक्ते रविकांत वरपे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, मा.नगरसेवक नाना काटे, मा.नगरसेवक प्रशांत शितोळे, मा. नगरसेविका सुमनताई पवळे, प्रदेश युवक उपाध्यक्ष विशाल वाकडकर, प्रदेश युवक सरचिटणीस विशाल काळभोर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, कार्याध्यक्ष रा.यु.काँ.पिं.चिंचवड शाम जगताप,युवक उपाध्यक्ष रा.यु.काँ.पिं.चिंचवड मयूर जाधव, सरचिटणीस रा.यु.काँ.पिं. चिंचवड प्रतीक साळुंखे, अक्षय माछरे, सुनील राणे, कुणाल साने, तानाजी खाडे, शशिकिरण गवळी, राजू खाडे, अनिल भोसले,विवेक गवळी, रमेश निकाळजे, सोमनाथ कदम, डिगा उदयकुमार, शमाकांत नांगरे, राजेश भगत, निखिल दळवी,ओमकार पवार तसेच महिला, तरुण कार्यकर्ते,नागरिक आणि प्रसाद कोलते यांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!