ताज्या घडामोडी

तळेगाव दाभाडे, येथे महिलेचा खून…

तळेगाव दाभाडे, पोलीस स्टेशन येथे अज्ञातावर गुन्हा दाखल..

 

 आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे,  प्रतिनिधी १० ऑगष्ट 

तळेगाव दाभाडे, येथे महिलेचा खून झाला असुन संगीता बाळासाहेब भोसले (वय ३८ रा. मंत्रा सीटी तळेगाव दाभाडे) मृत महिलेचे नाव आहे. त्या मंगळवारी सकाळी ८.३० वा. सुमारास इंद्रपुरी येथील भंडारी व्हिलाजवळ रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या आढळल्या स्कुटर घसरुन अपघात झाला असावा असे प्रथम दर्शनी जाणवले.

संगीता भोसले या सकाळी ८ वा. सुमारास दुध खरेदीसाठी त्यांच्या दुचाकीवरुन दुकानात गेल्या तेथुन इंद्रपुरी येथे राहणाऱ्या त्यांच्या आई वडीलांच्या घरी जात असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला पोलीसांनी तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनाच्या वेळी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे आढळून आले.

त्या नुसार तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन येथे अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास चालू आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!