ताज्या घडामोडी

कै दत्तोबा महाराज शेटे प्रतिष्ठान आयोजित भजन स्पर्धेत नाथसागर भजनी मंडळ व सुरताल भजनी मंडळ प्रथम.

शेटेवाडी येथील मृदूंगाचार्य व वैकुंठवासी दत्तोबा महाराज शेटे प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या भव्य भजन स्पर्धेत नाथसागर भजनी मंडळ (बेडसे ) व सुरताल भजनी मंडळ (खोपोली ) यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकावला.

सामाजिक.

 कै दत्तोबा महाराज शेटे प्रतिष्ठान आयोजित भजन स्पर्धेत नाथसागर भजनी मंडळ व सुरताल भजनी मंडळ प्रथम.

आवाज न्यूजः मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.१३(प्रतिनिधी )

शेटेवाडी येथील मृदूंगाचार्य व वैकुंठवासी दत्तोबा महाराज शेटे प्रतिष्ठान तर्फे आयोजित केलेल्या भव्य भजन स्पर्धेत नाथसागर भजनी मंडळ (बेडसे ) व सुरताल भजनी मंडळ (खोपोली ) यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकावला.
मृदूंगाचार्य वैकुंठवासी दत्तोबा महाराज शेटे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या भजन स्पर्धा व वारकरी भूषण आणि गुणवंत गुणीजन हा पुरस्कार सोहळा हा कार्यक्रम मान्यवरांचे उपस्थितीमधे ऊत्साहात संपन्न झाला.

यावेळी उपस्थित महाराष्ट्रातील नामावंत भजन सम्राट गुरुवर्य पंडित बाळासाहेब वायकर सर यांच्या पंचपदीने भजन स्पर्धेची सुरवात झाली.
सुखदेव महाराज ठाकर व मुकुंद नाना राऊत यांना वारकरी भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. व गुणवंत गुरुजन पुरस्कार मुख्याध्यापक संपत धावडे सर व अध्यापिका प्रदन्या माळी यांना प्रदान करण्यात आला.

भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक नाथ सागर भजनी मंडळ ( बेडसे ) व सुरताल भजनी मंडळ ( खोपोली – रायगड ) यांना विभागुन देण्यात आला .
द्वितीय क्रमांक श्री.भैरवनाथ भजनी मंडळ, ( कुसगाव बुद्रूक , लोणावळा ) व ज्ञानराज संगीत भजन मंडळ ( आळंदी ) यांना विभागून देण्यात आला.
तृतीय क्रमांक रेणुका भजनी मंडळ ( तळेगाव दाभाडे ), ताजुबाई भजनी मंडळ ( ताजे ) आणि स्वरगंधा भजनी मंडळ ( भीमा – कोरेगाव ) यांना देण्यात आला. ऊत्कृष्ठ गायक हे पारितोषिक रुपेश देशमुख (खोपोली ) व वसंत मुंगसे (कुसगाव बुद्रूक ) यांना ; ऊत्कृष्ठ तबला वादक बाल कलाकार ( ताजे भजनी मंडळ ) कार्यक्रमाचे आयोजन मावळ भुषण भजन सम्राट नंदकुमार शेटे महाराज यांनी केले होते . यावेळी माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे , भाजपा प्रभारी भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती निवृती शेटे , भारतीय किसान संघाचे माजी जिल्हा अध्यक्ष शंकर मामा शेलार, भाजी सरपंच यदुनाथ चोरघे, महाराष्ट्र पोलिस बळीराम चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लक्ष्मण महाराज शेलार यांनी केले आभार माजी ऊपसरपंच रामदास तथा बाळासाहेब शेटे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मयुर शेठ शेटे , राजुशेठ धुमाळ , उद्योजक जयेश मराठे , माणिक शिंदे, काशीनाथ महाराज मोरमारे , मनोज नंदकुमार शेटे, दयानंद जाधव, श्रीकांतशेठ भेगडे आदींनी परीश्रम घेतले .
यावेळी उपस्थित समस्त शेटे बंधु व ग्रामस्थ ऊपस्थीत होते हा कार्यक्रम गेली पंधरा वर्षे अविरत पणे सुरु आहे.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!