ताज्या घडामोडी

लोणावळा शहरातील 2 माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये जाहिर प्रवेश…      

भाजपा नेते व माजी खासदार किरिट सोमय्या यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

लोणावळा शहरातील 2 माजी नगरसेवकांचा भाजपामध्ये जाहिर प्रवेश       

आवाज न्यूज: लोणावळा प्रतिनिधी23 ऑगष्ट. 

लोणावळा नगरपरिषदेचे दोन माजी नगरसेवकांनी आज भाजपामध्ये जाहिर प्रवेश केला. तर शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होता होता थांबला.

भाजपा नेते व माजी खासदार किरिट सोमय्या यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. लोणावळा शहरात आज भाजपाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात किरिट सोमय्या यांनी भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊ गुंड, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल, गटनेते देविदास कडू सर्व माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेचे माजी शहरप्रमुख व दोन वेळचे वलवण नांगरगाव विभागाचे माजी नगरसेवक सुनिल इंगूळकर, काँग्रेसच्या खंडाळा विभागाच्या माजी नगरसेविक कांचन गायकवाड यांच्यासह उद्योजक सुधिर पारिठे, अभय पारेख व सहकारी, प्रतिक बोरकर, रमेश गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शौकत शेख, देविदास कडू, सुष्मा कडू, सुनिल तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपामध्ये प्रवेश केला.

शिवसेनेचे खंडाळा येथील विभाग संघटक पक्ष प्रवेशासाठी कार्यक्रम हॉल मध्ये दाखल झाले. एका उत्साही कार्यकर्त्यांने त्यांच्या गळ्यात भाजपाचा पट्टा देखील घातला मात्र काही तांत्रिक कारणामुळे हा प्रवेश झाला नाही. इतर युवा व महिला प्रवेश मोठ्या संख्येने झाले. लोणावळा शहरात भाजपाने केलेल्या कामांवर विश्वास ठेवून इतर पक्षाचे कार्यकर्ते भाजपामध्ये येत असल्याचे याप्रसंगी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सांगितले.

लोणावळा शहरात पुन्हा भाजपाचाच नगराध्यक्ष होणार यात शंका नाही पण आपल्याला यावेळी कोणाच्याही कुबड्यांवर अवलंबून राहयचे नाही. लोणावळा नगरपरिषदेवर एकहाती सत्ता मिळवायची असल्याचे नगराध्यक्षा सुरेखा जाधव व माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी सांगितले. याकरिता कार्यकर्त्यांनी कामाला लागा असे आवाहन केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!