ताज्या घडामोडी

आता मालमत्ता कर भरा गुगल पे,फोनपे ,पेटीएम,भिम ऍप्स द्वारे. विजयकुमार सरनाईक

नगरपरिषदेच्या रांगेत उभे राहण्याचे आवश्यकता नाही..

आता मालमत्ता कर भरा गुगल पे,फोनपे ,पेटीएम,भिम इत्यादी ऍप्स द्वारे… नगरपरिषदेच्या रांगेत उभे राहण्याचे आवश्यकता नाही..

आवाज न्यूज: 27 ऑगष्ट..तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने तळेगाव दाभाडे शहरातील मालमत्ताधारकांना त्यांचा मालमत्ता कर सुलभतेने भरता यावा यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या भारत बिल पेमेंट सिस्टीम वर (BBPS) नोंदणी यशस्वीरीत्या केली आहे.त्यामुळे तळेगाव दाभाडे शहरातील मालमत्ताधारक तळेगाव दाभाडे नगरपरिषद कार्यालयात रांगेत उभे न राहता त्यांचा मालमत्ता कर विविध युपीआय ऍप्सद्वारे (उदा. फोनपे, गुगल पे, पेटीयम, भीम व इतर ऍप्स ) भरू शकतात असे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  विजयकुमार सरनाईक यांनी सांगितले.
सदरचे घरपट्टी शुल्क भरण्याकरीता

१) नागरिकांनी त्यांच्या युपीआय ऍप (फोनपे, गुगल पे, पेटीयम, भीम व इतर ऍप्स) मधील Bill Pay सेक्शन मधील Municipal Tax हा पर्याय निवडावा.
२) त्यानंतर प्राप्त होणा-या यादीमधील Talegaon Dabhade Nagar Parishad निवडावी.
३) तद्नंतर मालमत्ताधाराकांनी आपला W ने सुरु होणारा मालमत्ता क्रमांक टाकून घरपट्टी बिलाचे विवरण तपासून सदरचा शुल्क भरावे.

सदर ऍप्स द्वारे मालमत्ता कराचाचा भरणा केलेनंतर संबधित मालमत्ताधारक त्यांच्या मालमत्ताकराची संगणकीकृत पावती तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वेबसाईटवर पुढील 3 दिवसात पाहू/डाउनलोड /प्रिंट करू शकतात.तसेच तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांना त्यांचे पाणीपट्टी कर सुद्धा सदरच्या बी.बी.पी.एस. युपीआय प्रणालीमध्ये भरणेची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाईल असे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांनी सांगतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!