ताज्या घडामोडी

शिक्षक निबंध स्पर्धेत प्रज्ञा माळी प्रथम..

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाअंतर्गत पंचायत समिती मावळच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक निबंध स्पर्धेत शेलारवाडी येथील माहेरवाशीन प्रज्ञा माळी यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

शिक्षक निबंध स्पर्धेत प्रज्ञा माळी प्रथम…

आवाज न्यूज: ऋत्विक जेजूरकर , मावळ.३ सप्टेंबर..

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाअंतर्गत पंचायत समिती मावळच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक निबंध स्पर्धेत शेलारवाडी येथील माहेरवाशीन प्रज्ञा माळी यांनी प्रथम क्रमांक मिळवला.

त्यांना मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी गटविकास अधिकारी सुधिर भागवत,सहा.गटविकास अधिकारी प्रताप पाटील,गटशिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे,शिक्षण विस्तार अधिकारी सुजाता शिंदे,कृष्णा भांगरे इ.मान्यवर उपस्थित होते.

प्रज्ञा माळी या मावळ तालुक्यातील कडधे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षिका असून त्यांचे वडील कै.जनार्दन माळी हे मराठी विषयाचे अभ्यासू शिक्षक होते.यापूर्वी त्यांचा पुणे जिल्हा शिक्षक निबंध स्पर्धेत तसेच पुणे जिल्हा पदवीधर सहविचार सभा शिक्षक निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक आला असून त्या उपक्रमशील शिक्षिका म्हणून सुपरिचीत आहेत.

त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल देहुरोड कँन्टो.बोर्डाचे मा.उपाध्यक्ष अशोक शेलार,अमरदेवी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र शेलार,युवा नेते सुहास माळी,शिक्षक नेते राजू भेगडे यांनी अभिनंदन केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!