ताज्या घडामोडी

संकल्प सामाजिक सेवा संस्थेतर्फे शिक्षक दिना निमित्त शिक्षकांचा सन्मान ..

संकल्प सामाजिक सेवा संस्थेतर्फे शिक्षक दिना निमित्त शिक्षकांचा शाल , पुष्पगुच्छ , श्रीफळ देवून संकल्प संस्थेच्या पदाधिकारी यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

 संकल्प सामाजिक सेवा संस्थेतर्फे शिक्षक दिना निमित्त शिक्षकांचा सन्मान ..

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.६ प्रतिनिधी.

संकल्प सामाजिक सेवा संस्थेतर्फे शिक्षक दिना निमित्त शिक्षकांचा शाल , पुष्पगुच्छ , श्रीफळ देवून संकल्प संस्थेच्या पदाधिकारी यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रारंभी भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे मान्यवरांचे हस्ते पूजन करण्यात आले. सोमवार दि.५ रोजी साते येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि न्यू इंग्लिंश स्कूल च्या सर्व शिक्षकांचा संस्थेचे कार्याध्यक्ष वदन आगळमे, सचिव मदन आगळमे, सह सचिव .नितीन आवटे आणि सह.खजिनदार .नितीन आगळमे यांच्या शुभहस्ते शाल,श्रीफल,आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाला शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन संकल्प सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!