ताज्या घडामोडी

हर्षोल्ल्हासात साजरा झाला कलापिनी चा कलागणेशोत्सव….

कलापिनीतील श्री कलागणेशाची स्थापना सर्व स्वास्थ्य योगीसभासदांनी अतिशय उत्साहात,आनंदात आणि भक्तिपूर्ण वातावरणात केली..

हर्षोल्ल्हासात साजरा झाला कलापिनी चा कलागणेशोत्सव….

आवाज न्यूज: विश्वास देशपांडे, तळेगाव स्टेशन ८ सप्टेंबर.

कलापिनीतील श्री कलागणेशाची स्थापना सर्व स्वास्थ्य योगीसभासदांनी अतिशय उत्साहात,आनंदात आणि भक्तिपूर्ण वातावरणात केली आणि रोज सकाळी आरती पण अगदी वेळेवर होईल ह्याची उत्तम व्यवस्था बकरे आणि  पांढरे यांच्या मार्गर्शनाखाली खाली उत्तम ठेवली होती.

गेली २० वर्षे कलापिनी तर्फे गणेश चतुर्थीच्या दिवशी संध्याकाळी उद्योग धाम येथे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम केले जातात. ह्या वर्षी सुद्धा हे सातत्य राखले गेले
कार्यक्रमाची सुरवात, लीना परगी यांनी श्री गणेशाच्या गाण्यांनी केली नंतर कुमार भवनच्या मुलांनी सुंदर नाटक आणि नृत्य सादर केले तसेच कलापिनी निर्मित.मनोज काटदरे दिग्दर्शित धम्माल विनोदी एकांकिका “फसला माधव दोन्ही कडे” चा शुभारंभाचा प्रयोग पण सादर करण्यात आला.

तेव्हा उद्योग धामच्या मुलांनी पण खूप छान नृत्य,नाट्य छटा सादर केल्या.उद्योग धाम तर्फे नाटकातील छोट्या मुलांना भेट वस्तू देण्यात आल्या.
कलापिनी कलागणेशा समोर रोज कलापिनीतील कलाकारांनी आपली कला सादर करून आशीर्वाद घेतले. बाल भवन, कुमार भवन, महिला मंच, स्वास्थ्य योग, सृजन नृत्यालय यातील सर्व कलाकारांनी श्री कला गणेशाला….कलेच्या देवतेला मानवंदना दिली.

ह्या वर्षी पासून कलापिनीमध्ये हा सर्व कलाकारांच्या सादरीकरणाचा नवा उपक्रम सुरू केला आहे.त्याला कलापिनीच्या सर्व विभागांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे..आणि स्वागतही झाले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!