ताज्या घडामोडी

बजरंगदल च्या वतिने किल्ले तुंग वर श्री गणेश मंदिरात महाआरती व अभिषेक….

विश्वहिंदु परिषद बजरंगदल मावळ तालुक्याच्या वतिने गेल्या काही वर्षापासून गणेशउत्सवाचे औचित्य साधुन किल्ले तुंग वरील श्रीगणेश मंदिरात महाआरती व अभिषेक करण्यात येतो.

सामाजिक: बजरंगदल च्या वतिने किल्ले तुंग वर श्री गणेश मंदिरात महाआरती व अभिषेक….

आवाज न्यूज:  हेमलता कचरे, पवनानगर,८ सप्टेंबर :

विश्वहिंदु परिषद बजरंगदल मावळ तालुक्याच्या वतिने गेल्या काही वर्षापासून गणेशउत्सवाचे औचित्य साधुन किल्ले तुंग वरील श्रीगणेश मंदिरात महाआरती व अभिषेक करण्यात येतो.

मावळ तालुक्यातील पवनमावळ परिसरातील तुंग किल्ला हा घाटरक्षक दुर्ग म्हणुन ओळखला जात असे पूर्वी बोरघाटामार्गे चालणाऱ्या वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याचा उपयोग होत असे चढाई श्रेणीत सोपा समजला जाणार किल्ला या किल्ल्यावर तुंगाई देवीचं व श्री गणरायाचे मंदिर आहे. गणेशोत्सव हा संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशात सगळीकडे उत्साहात साजरा होतो पण छत्रपतीं ज्या ठिकाणी दर्शनाला जायचे असे हे गड किल्यांवरील गणपती मंदिरे एन गणेशोत्सवात ओस पडलेली असतात. आपण घरोघरी गणेश उत्सव मोठ्या उत्सहात पुजा आर्चा करुन साजरा करतो मात्र गडकिल्यांनवर मंदिरामध्ये गणेशऊत्सवाच्या काळात आरती किंवा पुजा हि होतं नाही याचं पार्श्वभुमीवर बजंरगदलाच्या वतिने गडावर पुजा व महाआरती गेले अनेक वर्षांन पासुन करण्यात येत आहे. यातुन बजरंगदलाने समाजापुढे एक वेळा आदर्शन निर्माण करुन दिला आहे.

भर पावसात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रथमतः गडावरील गणेश मंदिरात स्वच्छता केली. गाभार्याची स्वच्छता केली. श्री गणरायाचा पंचामृताने अभिषेक करण्यात आला. महाआरती करून विधिवत पूजन केले गेले. त्याच बरोबर गडावर असलेले मारूती मंदिरात ही स्वछता करून अभिषेक करण्यात आला.

गड किल्ले हा हिंदवी स्वराज्याचा अनमोल ठेवा असून तो जपला पाहिजे त्यातूनच राष्ट्र भक्तीची प्रेरणा मिळत राहते असे व्याख्याते बाळासाहेब खांडभोर यांनी सांगीतले.

बजरंग दलाचे प्रेरणा स्थान म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले या गड कोटांवर असलेल्या मंदिरांची देखभाल करणे हे प्रत्येकाचे काम आहे आणि तेच सेवेचं कामं आम्ही बजरंगी करतं असतो – संदेश भेगडे विभाग संयोजक बजरंग दल.

यावेळी सोलापुर विभागाचे संयोजक संदेश भेगडे, बाळासाहेब खांडभोर, महेंद्र असवले, विशाल ढोले, दिपक आडकर, निखिल भांगरे यांच्या सह आदी उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!