ताज्या घडामोडी

वायसीएम रूग्णालयामध्ये राबविले जात आहे; व्यसनमुक्तीची कार्यशाळा ..

वायसीएम रूग्णालयातील सुरक्षारक्षक कर्मचार्यांसाठी विमल फौंडेशनच्या वतीने व्यसनमुक्ती समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली.

वायसीएम रूग्णालयामध्ये राबविले जात आहे; व्यसनमुक्तीची कार्यशाळा

आवाज न्यूज: गुलामअली भालदार,  चिंचवड १३

वायसीएम रूग्णालयातील सुरक्षारक्षक कर्मचार्यांसाठी विमल फौंडेशनच्या वतीने व्यसनमुक्ती समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली. दि.१ जून पासुन वायसीएमचे अधिष्टाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी तंबाखू व तत्सम अंमली पदार्थ मुक्त वायसीएम रूग्णालय करण्याच्या दिशेने ही कार्यशाळा आयोजित केली होती.

या व्यसनमुक्त समुपदेशन कार्यशाळेत तुषार शिंदे यांनी प्रार्थना घेऊन कार्यक्रमास सुरुवात केली. डॉ् निलिमा बोरकर यांनी तंबाखू व तत्सम अंमली पदार्थांचे शरीरावर होणारे दुष्परिणामांची शास्त्रीय माहिती देत कशा प्रकारे आज व्यसनामुळे अनेक शारीरिक आजार होतात हे विस्तृतपणे सांगीतले. व्यसनमुक्ती समुपदेशक व संस्था अध्यक्ष विल्यम साळवी यांनी व्यसनमुक्ती कशी शक्य आहे. याबद्दल माहिती दिली. आभार प्रदर्शन जयश्री जगताप यांनी केले.

या कार्यक्रमास ७५ सुरक्षारक्षक व महिला सुरक्षारक्षक ही उपस्थित होते. अनेकांनी आजपासुन तंबाखू सेवन न करण्याची ग्वाही दिली. वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे व सुरक्षारक्षक अधिकारी संदिप बहिरवाल यांनी व्यसनमुक्ती समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन केले होते. विमल फौंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम पुढे सहा महिने टप्प्याटप्प्याने राबवला जाणार असल्याचे संस्थेचे विल्यम साळवी यांनी सांगितले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!