ताज्या घडामोडी

सेक्स तंत्र शिबीर राबवणाऱ्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल.. मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर..

नवरात्री स्पेशल म्हणून तीन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी 15 हजार रुपये तीन दिवस व दोन रात्री राहण्याची,खाण्याच्या सोयीसह सेक्स तंत्र प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवून वयाची कोणतीही अट या प्रशिक्षार्थींना न घालता जाहिरात करणाऱ्या सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशन या आयोजकांविरुद्धसायबर पोलीस ठाण्याकडे तक्रार नोंद...

सेक्स तंत्र शिबीर राबवणाऱ्या आयोजकांविरोधात तक्रार दाखल

आवाज न्यूज:  पुणे प्रतिनिधी १७ सप्टेंबर.

  • पुणे हे सांस्कृतिक व विद्येचे माहेरघर बरोबरच आयटी क्षेत्रात देशातले नावाजलेले शहर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात आता सेक्स तंत्र प्रशिक्षण याची राजरोसपणे समाजमाध्यमातून जाहिरात करून नवरात्रीमध्ये नवरात्री स्पेशल म्हणून तीन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी 15 हजार रुपये तीन दिवस व दोन रात्री राहण्याची,खाण्याच्या सोयीसह सेक्स तंत्र प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवून वयाची कोणतीही अट या प्रशिक्षार्थींना न घालता जाहिरात करणाऱ्या सत्यम शिवम सुंदरम फाउंडेशन या आयोजकांविरुद्ध

मानवी हक्क संरक्षण जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर व आकाश भोसले यांनी विश्रामबाग पोलीस ठाणे व सायबर पोलीस ठाण्याकडे तक्रार नोंद करून भारतीय दंड संहितेच्या कलम 292,293 अन्वये अश्लील साहित्य वाचण्यास,पाहण्यास व ऐकण्यास आमंत्रित करून नीती भ्रष्ट करण्यास प्रवर्त करणाऱ्या व अश्लील साहित्य तरुण व्यक्तींना देण्याचा संभव असलेल्या या आयोजकांविरुद्ध जरी हा सेक्स तंत्र शिबीर कार्यक्रम रद्द केला असला तरी आयोजकाने अश्लील चित्र टाकून समाजमाध्यमातून प्रसारित करून जाहिरात करण्याबाबत गुन्हा नोंद होणे कामी तक्रार दाखल केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!