ताज्या घडामोडी

सुदर्शनगरमध्ये (चिंचवड) खड्ड्यांचे साम्राज्य…

या परिसरात सिमेंटचे रस्ते करावे, अशी मागणी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी पालिकेचे आयुक्त यांच्याकडे इमेलद्वारे केली आहे...

आवाज न्यूज: चिंचवड प्रतिनिधी १७ सप्टेंबर. 

पिंपरी चिंचवड शहरात १९६२ सालापासून या परीसरात गावडे कॉलनी व गोलांडे मळा परीसरात शेती होत होती पिंपरी चिंचवड शहरात टेल्को, रस्टन, एसकेएफ, कूपर, बजाज ऑटो, टेम्पो कंपनी जोमात सुरू असताना येथे काम करणारे कामगार निगडी, चिंचवडगांव, आकुर्डी गांवठाण, काळभोर नगर, सटोआप्पा गवळी चिंचवड येथे भाडयाच्या धरात वास्तव्य करीत होते.

महाराष्ट्र राज्याने सहकारी गृहरचना कायदा १९६४ साली संमत केला या शहरात प्रथम चिंचवड गांव येथे रस्टन कंपनीतील कामगारासाठी कंपनी व्यवस्थापनाच्या पुढाकारातून रस्टन सहकारी सोसायटी स्थापन करून कंपनीतील कामगाराना स्वतःची घरे निर्माण करून स्वतःचे घरकुल निर्माण करून दिले. नंतर पारीजात बन सहकारी गृहसंकूलमध्ये एसकेएफ, कूपर, रस्टन, टेल्को, बजाज कंपनीतील कामगारासाठी सन १९६४ स्वतःची घरे निर्माण करून दिली शहराच्या औद्योगिक क्षेत्रात येथील नागरीकांचे मोठे योगदान होते.

जसे जसे शहरात औद्योगिक नगरी वाढत गेली तसतसे सुदर्शन नगर परीसरात गणेशनगर, गावडे पार्क, भोईरनगर आता गोलांडे इस्टेट मध्ये दहा ते अकरा मजल्याचे इमारती निर्माण झाल्या. या परिसरात आताच्या घडीला २५ हजाराहून अधिक लोकसंख्या असून सुद्धा रस्त्याची दुरावस्था खेडेगावातील ग्रामपंचायतीच्या रस्त्याप्रमाणे झाली आहे येथे शाळा, दवाखाने असून सुद्धा रस्त्यावर जागोजागी गोलांडे इस्टेट पर्यत खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पालीकेने व स्थानिक नगरसेवकांनी स्मार्ट सिटी अंतर्गत श्रीधरनगर आदी तूरळक लोकसंख्या असलेल्या ठिकाणी सिमेंटचे रस्ते केले. परंतू, शहराच्या विकासामध्ये योगदान देणाऱ्या नागरीकाकडे का दुर्लक्ष केले जातात असा सवाल या परीसरातील ७० वर्षापुढील जेष्ठ नागरीक विचारणा करीत आहे पालीका आयुक्तानी स्वतः भेट या परीसरात  देवुन आज शाळेत जाणारे विद्यार्थी, पालक, फिरायला जाणारे जेष्ठ नागरिक, दुचाकी, चारचाकी वाहने चालविणाऱ्याची गैरसोय दूर करावी, या परिसरात सिमेंटचे रस्ते करावे, अशी मागणी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यांनी पालिकेचे आयुक्त यांच्याकडे इमेलद्वारे केली आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!