ताज्या घडामोडी

लोणावळ्यातील उद्योजक राजूशेठ बबनराव पवार यांचे निधन..

आमृतसर येथे वाघा बाॕर्डरजवळ फिरायला गेलेले असताना हृदयविकाराच्या झटक्याने उपचार सुरू असताना निधन..

लोणावळ्यातील उद्योजक राजूशेठ बबनराव पवार यांचे निधन..

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.२१(प्रतिनिधी )

लोणावळ्यातील उद्योजक राजूशेठ बबनराव पवार यांचे ता.१८ रोजी आमृतसर येथे वाघा बाॕर्डरजवळ फिरायला गेलेले असताना हृदयविकाराच्या झटक्याने उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी , वडील , एक भाऊ , एक अविवाहीत मुलगा , एक अविवाहित मुलगी , एक बहीण , तीन चुलत बहिणी असा परिवार आहे. लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगरसेवक बबनराव पवार हे त्यांचे वडील होत. विनायक ट्रॕव्हल्सचे मालक किशोरशेठ बबनराव पवार यांचे ते थोरले बंधू होते.

याबाबत कुटूंबातील सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार कै.राजूशेठ पवार हे पंजाब येथील अमृतसर येथे वाघा बाॕर्डर व वैष्णव देवी येथे ते कुटूंबातील महिला सदस्या आणि दाजी शिवाजीराव कुटे असे तेरा लोक मुंबई मार्गे फिरायला गेले होते. भारत पाकिस्तान वाघा बाॕर्डरजवळ ता.१८ रोजी सैन्यदलांचे परेड पाहून परतत असताना कै.पवार यांना अचानक छातीत कळ आल्याने जवळच असलेल्या मिलीटरी हाॕस्पिटलमधे उपचारास दाखल केले. तेथून प्राथमिक उपचारास त्यांना खाजगी रूग्णलयात दाखल केले. तेथे त्यांचेवर उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचे डाॕक्टरांनी घोषित केले.
कै.पवार यांचे पार्थिव पंजाब ते दिल्ली आणि मुंबई मार्गे विमानातून कार्बोमधून लोणावळ्यात ता.२० रोजी पहाटे आणण्यात आले. तुंगार्ली येथील स्मशानभूमित कै.पवार यांचे पार्थिवावर पहाटे चार वाजताचे सुमारास शोकाकूल वातावरणात आंत्यसंस्कार करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक भालचंद्र खराडे आणि अशोक मावकर यांनी श्रध्दांजली वाहिली. यावेळी विविध क्षेत्रातील लोक व ग्रामस्थ , नातेवाईक , मिञपरिवार उपस्थित होता.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!