ताज्या घडामोडी

डॉ. भंडारी “महेशरत्न “बहुमानाने सन्मानित…..

सकल माहेश्वरी समाज महाराष्ट्र राज्य यांचेवतीने सामाजिक क्षेत्रातील बहुमानाचा महेशरत्न पुरस्कार तळेगाव दाभाडे येथील  डॉ. शाळीग्राम भंडारी यांना नुकताच इचलकरंजी येथे पार पडलेल्या समारंभात प्रदान करण्यात आला.

डॉ. भंडारी “महेशरत्न “बहुमानाने सन्मानित”.

 आवाज न्यूज: तळेगाव दाभाडे, २३ सप्टेंबर

सकल माहेश्वरी समाज महाराष्ट्र राज्य यांचेवतीने सामाजिक क्षेत्रातील बहुमानाचा महेशरत्न पुरस्कार तळेगाव दाभाडे येथील  डॉ. शाळीग्राम भंडारी यांना नुकताच इचलकरंजी येथे पार पडलेल्या समारंभात प्रदान करण्यात आला.

डॉ. भंडारी यांनी गेल्या काही वर्षात आपल्या वैद्यकीय सेवेसोबत अनेक समाजोपयोगी ऊपक्रम राबविले आहेत. त्यामध्ये विविध रोगांवर निशुल्क मार्गदर्शन शिबिरे. गरजु गरीब बाधित रुग्णांना मोफत औषधोपचार तसेच शस्त्रक्रिया वगैरेंचा ऊल्लेख करता येईल. तालुक्यातील पाचाणे येथील कै.शांताबाई येवले संचलित “आभाळमाया “या निराधार मुलींसाठी असणाऱ्या संस्थेचे ते अनेक वर्षे मुख्य सल्लागार तसेच आधारस्तंभ आहेत.
बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गरज ओळखून त्यांनी आपल्या हॉस्पीटलजवळ ऊभा केलेला बसस्टॉप हेदेखील त्यापैकी एक.

एक नामंकीत वैद्यकीय तज्ञ असणारे डॉ. भंडारी यांनी स्वतःची अशी लेखन शैली देखील त्यांनी शब्दांकित केलेल्या जवळपास वीस पुस्तके प्रकाशन करून वाचकांचे सेवेत आणली आहेत.
आपल्या दिवंगत सहचारिणी पत्नीचे स्मृतीप्रित्यर्थ “नाना नानी पार्क” येथे ऊभे केलेले “सभागृह “अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी ऊपयोगी ठरत आहेत.
कडोलकर कॉलनीतील लायन्सक्लबचे प्रांगणात ऊभा केलेला “खुलारंगमंच”हा देखील त्यापैकी एक. शतायुषी जिवनाच्या यशस्वीतेसाठी आवश्यक असणारा योगऊपचार येथे स्वामी विवेकानंद हास्य योग केंद्रामधे डॉ. साहेबांचे मार्गदर्शनाखाली अव्याहतपणे सुरू आहे. लायन्स क्लब. श्रीरंग कलानिकेतन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद. मावळ तालुका साहित्य परिषद आदी संस्थेमध्ये डॉ. साहेब कार्यरत आहेत. डॉ. साहेबांचे विविध भाषांवर प्रभुत्व असल्याने ते ऊत्तम वक्ते तसेच विचारवंत आहेत

. जळगाव(खानदेश)येथे दिव्यांगांसाठी कार्यरत असणाऱ्या यजुर्वेद महाजन संचलित “दिपस्तंभ”  संस्थेचे सल्लागार तसेच आधारस्तंभ आहेत. डॉ. साहेबांच्या या संपूर्ण कामाचा राज्य स्तरावरील माहेश्वरी समाजाचे प्रतिनिधींनी वैयक्तिकपणे भेट देऊन माहिती घेतली आहे. डॉ. साहेबांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. परंतु राज्य पातळीवरील हा सर्वोच्च पुरस्कार नक्कीच वेगळा तसेच प्रेरणादायी ठरेल.
सन्मानामधे सन्मानचिन्ह मानपत्र तसेच असंख्य समाजबंधुच्या स्नेहमय शुभेच्छा अंतर्भूत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!