ताज्या घडामोडी

प्रतिभा महाविद्यालय व लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांच्या सहकार्याने मंथन फाउंडेशनने (ॲक्ट ऑन एन.सी.डी.एस.) चे प्रक्षेपण केले.

प्रतिभा महाविद्यालय व लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांच्या सहकार्याने मंथन फाउंडेशनने (  ॲक्ट ऑन एन.सी.डी.एस.) चे प्रक्षेपण केले.

आवाज न्यूज: गुलामअली भालदार , चिंचवड २४ सप्टेंबर :

ग्लोबल वीक फॉर ॲक्शन ऑन असंसर्गजन्य आजार सप्ताह च्या निमित्ताने प्रतिभा महाविद्यालय व लायन्स क्लब ऑफ तळेगाव यांच्या सहकार्याने मंथन फाउंडेशनने (ॲक्ट ऑन एन.सी.डी.एस.) प्रोजेक्ट” इन्व्हेस्ट टू प्रोटेक्ट” लाँच केले. २०२२ मधील एन.सी.डी.एस. वरील जागतिक कृती सप्ताहाचे उद्दिष्ट सरकार, देणगीदार, आंतरराष्ट्रीय एजन्सी आणि खाजगी क्षेत्रापर्यंत संदेश पोहोचवण्याचे आहे. आजच एन.सी.डी. मध्ये गुंतवणूक करा व उद्या जीव आणि पैसा वाचवा.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग, भारत सरकार आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान चा एक भाग म्हणून कर्करोग, मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि स्ट्रोक प्रतिबंध आणि नियंत्रण कार्यक्रम २०१० मध्ये सुरू करण्यात आले, त्यावर आधारित कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी सांगितले की, (अॅक्ट ऑन एन.सी.डी.एस.) अंतर्गत २०२४ पर्यंत ३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या एक लाख व्यक्तींची स्क्रीनिंग करण्याचे नियोजन आहे. वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथी (ट्रान्सजेंडर) समुदायापासून तपासणी स्क्रीनिंग ची सुरुवात करण्यात आली.
गैर-संसर्गजन्य रोग (एन.सी.डी.एस.) च्या उपचारांसाठी आरोग्य सेवा सुविधेच्या योग्य स्तरावर प्रतिबंध, लवकर निदान, व्यवस्थापन आणि संदर्भ देण्यासाठी आरोग्य प्रोत्साहन आणि जागरूकता निर्माण करण्यावर हा कार्यक्रम केंद्रित आहे.
दीपक निकम चीफ ऑपरेशनल ऑफिसर मंथन फाउंडेशन म्हणाले, डब्ल्यूएचओ नुसार असंसर्गजन्य रोग मोठ्या प्रमाणात टाळता येण्याजोगे आहेत, ८० टक्के हृदयविकार, मधुमेह, आणि ४० टक्के कर्करोग, आपल्या जीवनशैली बदलांनी टाळता येऊ शकतात. त्यासाठी सकस खाणे आवश्यक आहे. क्रियाकलाप आणि तंबाखू टाळा., असे आवाहन केले.

या प्रसंगी प्रतिभा शैक्षणिक संकुलाचे संस्थापक सचिव व लायन्स क्लबचे माजी प्रांतपाल डॉ. दीपक शहा यांनी प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आणि एनसीडीच्या तपासणीसाठी संस्थेस वैद्यकीय उपकरणे सुपूर्त केले आणि मंथन फाऊंडेशनच्या भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

डॉ. चेतन चव्हाण यांनी जीवनशैलीचा उच्चरक्तदाब आणि पूर्वस्थितीवर होणारा परिणाम याविषयी माहिती दिली.
डॉ. राजेंद्र कांकरिया यांनी सर्व वेश्या व्यवसाय महिलांना विश्वास दिला की आपल्याला जी काही मदत लागेल ती मंथन फाउंडेशनद्वारे पूर्ण होण्यासाठी आम्ही सर्वांच्या सोबत आहोत.
माननीय दीपक शहा, माजी लायन गव्हर्नर, आशा भट्ट, अध्यक्ष मंथन फाउंडेशन, लायन मयूर राजगुरव- अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ तळेगाव, प्रतिभा महाविद्यालयाचे मुख्यप्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, लायन प्रशांत शहा, लायन अक्षता राजगुरव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

वृषाली गोरे, सुवर्णा पवार, गणेश खेडेकर, अनिता उबाळे, आरती गणुरे, आरती आंग्रे, वर्षा गावडे, मोनिका बोरगे, कविता, मेरी डीसोजा, राधा पाटील, रमा यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!