ताज्या घडामोडी

लोणावळा नगरिषदेस सलग पाचव्यांदा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये अव्वल ठरली ; देशात मानाचा तुरा;

लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाल्यापासून प्रत्येक वर्षी अव्वल राहून देश पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण

लोणावळा नगरिषदेस सलग पाचव्यांदा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये अव्वल ठरली ; देशात मानाचा तुरा;

आवाज न्यूज: मच्छिंद्र मांडेकर,  लोणावळा ता. २ प्रतिनिधी.

लोणावळा नगरिषदेस सलग पाचव्यांदा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये अव्वल ठरली ; देशात मानाचा तुरा रोवला आहे. लोणावळा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाल्यापासून प्रत्येक वर्षी अव्वल राहून देश पातळीवर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

यावर्षी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये देशात ५०हजार ते १ लाख या गटात लोणावळा शहर सर्वात स्वच्छ शहर म्हणून घोषित करण्यात आले. नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियम वर हा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमास लोणावळा नगरपरिषद मार्फत मुख्याधिकारी पंडित पाटील, माजी नगराध्यक्षा  सुरेखाताई जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शहर समन्वयक अक्षय पाटील, नगर अभियंता, वैशाली मठपती, नगर परिषद अभियंता यशवंत मुंडे, खरेदी पर्यवेक्षक दत्तात्रय सुतार, सहाय्यक ग्रंथपाल विजय लोणकर यांनी स्वीकारला.देशातील पर्यटकांना सदैव आकर्षित करणारे पर्यटनस्थळ असलेली लोणावळा नगरपरिषद ही स्वच्छ सर्वेक्षण मध्ये कायमच अग्रेसर राहिली आहे. यात सर्व नगरपरिषद अधिकारी कर्मचारी, सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, सर्व पत्रकार संघ, सामाजिक संस्था, शाळा व नागरिक यांचेमुळेच हे यश असे अबाधित राहिले असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले.

या पुढेही स्वच्छ सर्वेक्षणात सातत्यपूर्ण कामगिरी राखण्याचा मानस मुख्याधिकारी .पाटील यांनी व्यक्त केला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!